शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेनोराच्या ‘त्या’२०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 19:39 IST

अ‍ॅमेनोरा स्कूलच्या या कृतीविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले होते.

ठळक मुद्देदाखले पाठविण्याची कृती बेकायदेशीर : तात्काळ कार्यवाही कराअ‍ॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्क वाढीला पालकांकडून सातत्याने विरोध शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार

पुणे : हडपसर येथील अ‍ॅमेनोरा स्कूलने पालकांनी फी भरली नाही म्हणून दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे दाखले कुरिअरने त्यांच्या घरी पाठविले होते. शिक्षण उपसंचालकांनी शाळेची ही कृती शिक्षण हक्क कायदा तरतुदीचा भंग करणारी असल्याचे स्पष्ट करून त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश शाळेला दिले आहेत.     अ‍ॅमेनोरा स्कूलच्या या कृतीविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले होते. शुक्रवारी शिक्षण उपसंचालक मिनांक्षी राऊत यांची भेट घेऊन पालकांनी याबाबत तक्रार केली. यापार्श्वभुमीवर शाळेने तातडीने या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश प्रभारी शिक्षण उपसंचालक मिनांक्षी राऊत यांनी दिले आहेत. अ‍ॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्क वाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. शाळेने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ६५ हजार रूपयांवरून ८५ हजार इतके केले होते. शुल्कवाढ करताना नियमानुसार पालक शिक्षक संघाची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे ही शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार दिला होता. मात्र शाळा प्रशासन शुल्कवाढ करण्यावर ठाम होते.  शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अचानक अ‍ॅमेनोरा शाळा प्रशासनाने दोनशे पालकांच्या त्यांच्या पाल्यास शाळेतून काढून टाकल्याचे स्पष्ट करून त्यांचे दाखले घरपोच पाठवून दिले. यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. शाळेमध्ये कार्यरत असलेल्या पालक-शिक्षक संघाच्या मान्यतेनंतर दर दोन वर्षांनी १५ टक्के शुल्क वाढ शाळांना मान्यता दिली आहे. मात्र या तरतुदीचे उल्लंघन करून अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वाढ करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याबाबत शाळांवर ठोस कारवाई शिक्षण विभागाकडून होत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण