शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विरोधकांनो.. तुम्ही कितीही बुध्दिभ्रम करण्याचा प्रयत्न करा.. पण जनता ‘सूज्ञ’ : मेधा कुलकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:59 PM

आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर शंखनाद करत आहेत.

पुणे : मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशांवर भिस्त असलेल्या लोकांच्या शेपटीवर पाय ठेवला गेला. सर्वसामान्य लोकांना जाणवलेला नोटांचा तुटवडा तात्पुरत्या स्वरूपाचा होता. परंतु, आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर शंखनाद करत आहेत. विरोधी पक्षातील मंडळी सर्वसामान्य व्यक्तींचा बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जनता सुज्ञ असून ती योग्य भूमिका ते घेईल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कविता रसिक मंडळीतर्फे ह्यएका संघषार्ची यशोगाथाह्ण या कार्यक्रमात कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी करमचे भूषण कटककर, ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी आणि भूषण कटककर यांनी मेधा कुलकर्णी यांचा कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रवास उलगडवून दाखवला. त्यांनी महिला सुरक्षितता, भाजप सरकारमधील वरिष्ठ पदाधिका-यांबरोबर वावरण्याचा अनुभव अशा प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.  कुलकर्णी म्हणाल्या, ह्यअभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा आरोप भाजप सरकारवर लावला जातो. आणीबाणीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्या सरकारने केला होता, याचे आत्मपरिक्षण करून दांभिकता थांबवावी. माज्या राजकीय वाटचालीदरम्यान कुटुंबातील सदस्यांपासून माज्यापर्यंत सगळ्यांनीच आपापल्या पातळीवर संघर्ष केला आहे. मी कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकले नाही, तरी क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न केला.ह्ण जे शिक्षण अध्ययन-अध्यापकाच्या पलीकडे जाऊन अभिवृत्तीत परावर्तित होते, ते खरे शिक्षण होय. तुम्ही डॉक्टर झाला असूनही कौमार्य चाचणीचा आग्रह धरत असाल तर तुमचे वैद्यकीय शिक्षण फोल ठरते. अलीकडचे शिक्षण हे गुणांभोवतीच गुंफलेले असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक जडणघडण होत नाही. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढेल, पण त्याचबरोबरीने सामाजिक आणि भावनिक संवेदना तितक्याच विकसीत होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी वर्षा हळबे यांना ह्यपुरस्कारह्ण या कवितेसाठी ऑनलाईन काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNote BanनोटाबंदीGovernmentसरकार