पुणे: जलयुक्त शिवार योजनेमुळे कमी पाऊस पडून देखील भूजल पातळी कायम राहण्यात यश आले असून राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी १०१ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) ३ हजार ९०० गावांतील सिंचन विहिरींच्या आधारावर सादर केलेल्या अहवालावरून संपूर्ण राज्याचे स्पष्ट होत नाही.त्यामुळे विरोधकांकडून जलयुक्त शिवार योजनेवर केली जाणारी टिका पोरकटपणाची आहे.तसेच श्रमदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे,असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केला. राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला.मात्र,त्यातून राज्याच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही; या उलट पाणी पातळीत घट झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केली जात आहे.त्यावर राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढलेल्या भूजल पातळीबाबत माहिती दिली.शिंदे म्हणाले,जलयुक्त शिवार योजना लोकांनी स्वाकारली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे श्रमदानातून झाली असून राज्यात एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांची कामे झाली आहेत.मराठवाड्यासारख्या भागातही गेल्यावर्षापर्यंत ४.५ मिटरने भूजल पातळी वाढली होती.राज्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत ११.५१ टक्के,मूग पिकात १.१८ टक्के, उडिद पिकात २ टक्के आणि बाजरीच्या पिकात ८ टक्के वाढ दिसून येत आहे.हे जलयुक्त शिवार योजनेचे यश आहे,असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, २०१७-१८ वर्षात अघवा ८४ टक्के पाऊस झालेला असताना १८० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते.तर २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस पडूनही केवळ १३८ लाख मेंट्रिक टन उत्पादन घेता आले होते.त्याचप्रमाणे यंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध असल्याने आॅक्टोबर महिन्यात वीजेची मागणी २९ टक्क्यांनी वाढली असल्याचे महावितरणकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.----------------जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावातच पाणी पातळीत घट झाली असल्याचा विरोधांकडून केला जाणारा आरोप धादांत खोटा असून राज्यात ५ लाख ४२ हजार कामे झाली आहेत.त्यामुळे राज्याची पिक उत्पादनात ४५ टक्के वाढ झाली आहे.तसेच टँकरच्या संख्येत घट झाली असून सध्या राज्यात केवळ १ हजार ४५ टँकर सुरू आहेत.जलयुक्तची कामे झाली त्या ठिकाणचे शेतकरी समाधानी आहेत,असेही राम शिंदे म्हणाले.
जलयुक्त शिवार योजनेवरील विरोधकांची टिका पोरकट : राम शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:55 IST
मदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला.
जलयुक्त शिवार योजनेवरील विरोधकांची टिका पोरकट : राम शिंदे
ठळक मुद्देराज्यात श्रमदानातून झाली असून एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांची कामेयंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी १०१ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ