शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'फुले' चित्रपटाला विरोध म्हणजे दलित, वंचित, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा अपमान - संजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:52 IST

डॉ. आंबेडकर जयंती देशभर साजरी होताना, ‘फुले’ चित्रपटाला विरोध हा खेदजनक असून हा दलित, वंचित समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा चित्रपट कोणत्याही काटछाटीशिवाय प्रदर्शित झाला पाहिजे.

पुणे शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संजय सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता, संयम आणि ठामपणे पक्षाची भूमिका मांडण्याचे आवाहन केले. तसेच, फुले दाम्पत्याचे कार्य आणि विचार हे आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला विरोध होणे म्हणजे दलित, वंचित आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ब्राह्मण समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप काही संघटनांनी केला असून, या विरोधामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला अडथळे निर्माण झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सप्ताह देशभर साजरा होत असताना, ‘फुले’ चित्रपटाला विरोध केला जाणे हे खेदजनक असून हा दलित आणि वंचित समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार आहे.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली. ‘वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५’ संदर्भात बोलताना त्यांनी आरोप केला की, हे विधेयक धार्मिक संस्थांच्या जमिनी बळकावण्यासाठी आणले जात असून, याचा थेट फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भांडवलदार मित्र घेणार आहेत. हे विधेयक घटनाविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाcinemaसिनेमाPoliticsराजकारणAam Admi partyआम आदमी पार्टीSocialसामाजिक