शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन बेल्ट‘चे आरक्षण वगळून निवासी करण्यास विरोध : वंदना चव्हाण; मुख्यमंत्र्यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:12 IST

राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान मुठा नदीकाठच्या भागातील ‘ग्रीन बेल्ट’चे (हरित पट्टा) आरक्षण वगळून हा भाग निवासी करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याबाबतचे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

ठळक मुद्देग्रीन बेल्ट चक्क निवासी करण्याचा तीव्र विरोध देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख या नात्याने यात तातडीने लक्ष घालावे : वंदना चव्हाण

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान मुठा नदीकाठच्या भागातील ‘ग्रीन बेल्ट’चे (हरित पट्टा) आरक्षण वगळून हा भाग निवासी करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याबाबतचे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशावरून टेकड्या आणि टेकड्यांलगत १०० फूटांच्या परिसररात बांधकाम बंदीचा आदेश नगरविकास विभागाने नुकताच काढला आहे. पर्यावरणाला अनुकूल हा निर्णय आहे; परंतु दुसरीकडे ग्रीन बेल्ट चक्क निवासी करण्याचा तीव्र विरोध आहे. मूठभर व्यावसायिकांच्या हितसंबंधांसाठी पुण्याच्या पर्यावरणाचा खेळखंडोबा होत आहे, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख या नात्याने यात तातडीने लक्ष घालावे व ही प्रक्रिया थांबवावी, अशी विनंती  चव्हाण यांनी या पत्राद्वारे केली आहे.राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान डीपी रस्त्यालगतचा ह्यग्रीन बेल्टह्ण निवासी करण्याचा प्रयत्न राज्याच्या नगरविकास खात्यामार्फत सुरू झाला आहे. त्यासाठी संबंधित परिसराचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर करावा, असे आदेश नगरविकास खात्याने महापालिकेला नुकतेच दिले आहेत. शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना महापालिका प्रशासनाने राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान मुठा नदीकाठच्या भागात ग्रीन बेल्ट कायम ठेवला आहे. जुन्या हद्दीचा विकास आराखडा राज्य सरकारने ५ जानेवारी २०१७ रोजी मंजूर केला. त्यात हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून कायम ठेवला आहे. तसेच राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान डीपी रस्त्यालगतच्या ह्यग्रीन बेल्टमधील बांधकामावर कडक कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने अंमलबजावणी करण्यास  देखील सुरवात केली होती. तरीही एनजीटीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून नगर विकास विभागाने मूठभर व्यावसायिकांच्या हितासाठी ग्रीन बेल्टचे आरक्षण बदलून त्याचे निवासीकरण करण्याचा घाट घातला आहे, असे या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :Vandana Chavanवंदना चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे