बदलापूर भुयारी गटार योजनेच्या कामाचा नगरविकास राज्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:48 PM2017-11-29T18:48:02+5:302017-11-29T19:05:20+5:30

भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केला आहे.या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा करण्याची घाई केलेली आहे.या प्रकरणात नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

The Minister of State for Urban Development asked for the work of Badlpur underground drainage scheme | बदलापूर भुयारी गटार योजनेच्या कामाचा नगरविकास राज्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

कॅप्टन आशिष दामले बदलापूर भुयारी गटारांची माहिती देताना

Next
ठळक मुद्देकाम पूर्ण झालेले नसतांनाही ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदाकॅप्टन आशिष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रारयोजनेच्या पूर्णत्वाचा दाखला नासतांनाही ठेकेदाराला बील अदा करण्याची घाई

बदलापूर - बदलापूर शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राष्ट्रावदीचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत शासनाने या भुयारी गटार योजनेच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या भुयारी गटार योजनेच्या झालेल्या कामाचा सविस्तर अहवाल आयआयटीकडुन करण्यात आले होते. त्या अहवालातील तरतुदींकडे पालिकेने दुर्लक्ष करुन हे बील अदा केल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. 
           कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेचे काम 2010 मध्ये मंजुर करण्यात आले होते. 150 कोटींची ही योजना पूर्ण करित असतांना त्या योजनेवर तब्बल 225 कोटी रुपये खर्च करण्यात आला. येवढा मोठा खर्च होऊन देखील प्रत्यक्षात मात्र या याजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. योजनेचा खर्च वाढत गेला असला तरी प्रत्यक्षात काम मात्र अपूर्णच ठेवण्यात आले. अनेक ठिकाणी अदयापही भुयारी गटाराचे पाईप टाकण्यात आलेले नाही. या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा करण्याची घाई केलेली आहे. या भुयारी गटार योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी आयआयटीकडुन करण्यात आली आहे. त्यात त्यांनी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी काही सुचना देखील दिल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन काम पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. मात्र पालिका प्रशासनाला काम करुन घेण्यापेक्षा त्या ठेकेदाराचे अकडलेले बील अदा करण्याची घाई सर्वाधिक होती. तब्बल 27 कोटी 90 लाखांचे बील अदा करुन पालिकेने ठेकेदाराला झुकते माप दिले आहे. भुयारी गटार योजनेचे काम करित असतांना ठेकेदाराने प्रत्येकवेळी कामात विलंब केला आहे. त्या बिलंबाचा आर्थिक लाभही मिळविला आहे. मुदत संपलेल्यावर प्रत्येकवेळी पालिकेकडुन मुदतवाढ मिळविण्याचा यशस्वी प्रय} या ठेकेदाराने केला आहे. 225 कोटी खर्च करुन देखील प्रत्यक्षात भुयारी गटार योजनेतुन मलनिस:रण प्रकल्पावर पाणीच जात नसल्याचे समोर आले आहे. हा प्रकार येवढय़ावरच थांबलेला नसुन शहरातील 70 टक्के जोडण्या अद्याप करुन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ अजुनही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. शासनाने योजना पूर्णत्वाचा दाखला मागविलेला असतांनाही या ठेकेदाराला बील अदा करण्यात आले आहे. योजना पूर्ण झालेली नसतांना त्यांना बील अदा केलेच कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शासनाच्या आदेशाचे विपर्यास करुन नियमबाह्य पध्दतीने कोटय़ावधीची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे केली असुन त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अहोत. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे दिलेले बील हे प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. 

 ‘‘ योजनेचे काम पूर्ण नसतांनाही त्या ठेकेदाराला येवढी मोठी रक्कम अदा करणो हे चुकीचे आहे. ठेकेदाराकडुन काम पूर्ण करुन घेण्याची गरज होती. ते न करता बील अदा करण्याची घाई प्रशासनाने केली आहे. ठेकेदाराला संरक्षण देण्याचे काम पालिका प्रशासन करित आहे. 
    - कॅप्टन आशिष दामले. गटनेते, बदलापूर

‘‘ भुयारी गटार योजनेची कोणतीच चौकशी लावण्यात आलेली नाही. कामाचा अहवाल शासनाने मागविला असुन तो अहवाल आम्ही शासनाकडे पाठविला आहे. तसेच ठेकेदाराला त्याचे बील नियमानुसार अदा करण्यात आलेले आहे. 
    - प्रकाश बोरसे, मुख्याधिकार. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद

 

Web Title: The Minister of State for Urban Development asked for the work of Badlpur underground drainage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.