शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'ओल्या सुक्या' पार्टीला विरोध; मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याची नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण; लोणी काळभोर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 18:59 IST

संबंधित पोलीस अधिकारी हे गेल्या ३ वर्षापासून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत भाडेतत्वावर राहत आहेत.

लोणी काळभोर : पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दारुची पार्टी करण्यास विरोध केला या कारणांवरून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पाचपेक्षा जास्त जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ( दि.१७ ) रात्री घडला आहे.

या प्रकरणी संबधित गृहनिर्माण संस्थेमधील कोणीही रहिवाशी तक्रार देण्यास न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही. विशेष बाब म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या आवारात ५० पेक्षा अधिक नागरिकांना दीड तासापेक्षा जास्त वेळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. असे असताना या अधिकाऱ्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

संबंधित पोलीस अधिकारी हे गेल्या ३ वर्षापासून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत भाडेतत्वावर राहत आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहर मुख्यालयाला जोडण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याने ते मंगळवारी ही सदनिका सोडुन बदलीच्या ठिकाणी राहण्यास जाणार होते. तत्पूर्वी या अधिकाऱ्याने लोणी काळभोर तसेच परिसरातील काही मान्यवर मित्रांसाठी सोमवारी रात्री घरातच पार्टीचे आयोजन केले होते. 

सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पार्टी सुरु होताच लॉकडाऊन असल्याचे सांगत या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व रहिवाशांनी या अधिकाऱ्याला पार्टी करु नये अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला. परंतू आपण पोलीस अधिकारी आहोत असे सांगत यास त्याने नकार दिला. तसेच त्याने ५ पेक्षा जास्त जणांना लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 

हा मद्यधुंद अधिकारी ऐकत नसल्याचे लक्षात येताचज मलेल्या ५० पेक्षा जास्त रिलोणी काळभोर पोलिस ठाणे गाठले. व तेथील अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. रहिवाशी पोलिसांनी माहिती देत असतानाच तो पोलीस अधिकारीही पोलिस ठाण्यात पोहोचला. परत तिथे या अधिकाऱ्याने रहिवाशांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावर पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने शिवीगाळ करणे सुरुच ठेवले. यावेळी रहिवाशी तक्रार देण्यावर ठाम असल्याचे लक्षात येताच त्याने हद्दीतील एका स्वयंघोषीत दादाला पोलिस बोलावुन घेतले. तो येताच, लोणी काळभोर पोलिसांनी रहिवाशांना कारवाई करतो असे सांगून घरी पाठवले. परंतू  मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मद्यपी अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नव्हती.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, पार्टी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन मद्यपी पोलीस अधिकाऱ्याकडुन रहिवाशा्ंना बेदम मारहाण व शिवीगाळ, गोंधळ घातल्याचा प्रकार खरा आहे. मात्र संबधित गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशी तक्रार देण्यास पुढे न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही. परंतू, हे नागरीक तक्रार देण्यास तयार असतील तर पोलीस तक्रार दाखल करुन घेण्यास तयार आहेत.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी