शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९१ देशांचे चित्रपट पाहण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:22 IST

‘महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष’ यंदाच्या महोत्सवात झळकणार

ठळक मुद्देराज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविले जाणार

पुणे : यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध देशांमधील १९१ चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.  पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दि. ९ ते १६ जानेवारी हा महोत्सव रंगेल.  विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष’ यंदाच्या महोत्सवात झळकणार असून, राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविले जाणार आहेत. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी परिषदेत दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी प्रशिक्षण संस्थेचे (एफटीआयआय) संचालक भूपेंद्र कँथोला, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे आणि अभिजित रणदिवे या वेळी उपस्थित होते.डॉ. पटेल म्हणाले, ‘‘१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. या गोष्टीला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि अग्रेसर आहे. राज्यात खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टी आणि या क्षेत्रातील दादासाहेब फाळके यांसारखे प्रणेतेदेखील जन्माला आले. चित्रपटसृष्टीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. म्हणूनच राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन यंदाच्या महोत्सवात घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’याशिवाय दृश्यकलेशी निगडित विविध विषयांच्या साक्षरतेचे धडे देणाऱ्या देशातील प्रतिष्ठित अशा ‘एफटीआयआय’ संस्थेला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महोत्सवाचा उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम यांसह अभिनय, छायालेखन (सिनेमॅटोग्राफी) आणि ध्वनी संयोजन कार्यशाळा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे भारतातील चित्रपट साक्षरतेचा उत्सवच साजरा केला जाईल, ही माहिती पटेल यांनी दिली. या वर्षी ६० देशांमधून तब्बल १,९०० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक १९१ चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवात चित्रपट रसिकांना मिळेल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, एफटीआयआय, आयनॉक्स आणि पीव्हीआर पॅव्हेलियन या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.  ....’पिफ’ला निधी वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार’पिफ’ हा शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. अनेक वर्षांपासून महोत्सवासाठी निधी वाढवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यंदाच्या वर्षीही महोत्सवातील चित्रपट दाखविण्यासाठी द्यावी लागणारी रॉयल्टीची रक्कम ध्यानात घेता राज्य शासनाने अधिक निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष ध्यानात घेता, या निधीमध्ये भरघोस वाढ होईल, अशी आशा असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले......महोत्सवाची वैशिष्ट्ये ४कंट्री फोकस (देश विशेष) या विभागात ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने   ‘युनायटेड किंग्डम’मधील चित्रपट आणि लघुपट ४ब्रिटनमधील ‘ब्रिटिश डॉक्युमेंट्री पुरस्कार’प्राप्त माहितीपट४गीतकार मजरुह सुलतानपुरी, संगीतकार नौशाद, सतारवादक- संगीतकार पं. रविशंकर आणि जागतिक प्रसिद्धी मिळालेले इटलीचे फेडरिको फेलिनी या दिग्गजांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चित्रपट पाहण्याची संधी ४सिंहावलोकन विभागात हृषीकेश मुखर्जी यांचे चित्रपट 

टॅग्स :PuneपुणेPIFFपीफcinemaसिनेमा