शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

...ही तर भाजपाचा पालिकेतील कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी : प्रशांत जगताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 15:15 IST

येत्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताही ताब्यात घेण्याचा व्यक्त केला निर्धार....

ठळक मुद्देप्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदाची स्विकारली सूत्रे

पुणे: मागील साडेचार वर्षातील भारतीय जनता पार्टीचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधीच राष्ट्रवादी काँगेसचा शहराध्यक्ष म्हणून मिळाली आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ता ताब्यात घेणारच असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

हिराबाग चौकातील पक्ष कार्यालयात जगताप यांनी मावळते अध्यक्ष आमदार चेतन तूपे यांच्या हस्ते शहराध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबराव चांदेरे, महिला पदाधिकारी शिल्पा भोसले व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तूपे व उपस्थितांनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना जगताप म्हणाले, भाजपाच्या आधी सलग १० वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. आम्ही जाहीर केलेल्या कामांचीच उद्घाटने विद्यमान सत्ताधारी भाजपा आत्ता करत आहे." सत्तेच्या काळात त्यांनी त्यांचे म्हणून केलेले एकतरी काम दाखवावे, असे आव्हानच जगताप यांनी दिले.

उपनगरांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहेच. ३३ गावांचा समावेश त्यांच्याच राज्यातील सत्ताकाळात झाला. आम्ही तिथेच काय, पण शहराच्या मध्यभागातही जोर दाखवू, कारण पुणेकरांचा आता भाजपावर हे तर काहीच कामाचे नाहीत असा रोष आहे. संघटन वाढवणाऱ्यावर भर देणार असून पक्षाचा तळागाळात पाया आहे, तो विस्तारण्याला प्राधान्य असणार आहे.  महापालिकेतील प्रमुख विरोधक आहोतच, तरीही कोरोना काळात आमचे त्यांना चांगल्या कामासाठी सहकार्य राहीलच. पण भ्रष्टाचार, लुटालूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जगताप यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण