शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:25 IST

जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २५ लोकांनी जीव गमावला. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबांचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने ते नागरिक अजूनही धक्क्यातच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. संपूर्ण देशाकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले. मात्र अमित ठाकरे यांनी कारवाईबाबत समाधानी नसल्याचे सांगत त्या अतिरेक्यांना ठेचून मारायला हवं अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

अमित ठाकरे, संपूर्ण देशभरामध्ये कौतुक होतंय. आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ, त्यांचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. पहलगाम घटनेनंतर जेवढं दुःख झालं होतं. तेवढा आनंद किंवा समाधान मला आज मिळालेलं नाही. कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायेत. भारतात असतील किंवा पाकिस्तान ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरतायेत. त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा ते दहा लोकं किंवा बारा लोकं जे आले होते ते मरतील .ज्यांनी आपल्या पंचवीस जणांची हत्या केली. ज्या अतिरेक्यांनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा. जसं राज साहेब बोलले की युद्ध हे उत्तर नाही. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याला जे सांगितलं जात ते ते करत असतात. काही लष्करचे अड्डे  किंवा काही दहशतवादी अड्डे तिकडे उध्वस्त झाले आहेत. पण शेवटी हा पहलगाम हल्ला कशामुळे झाला? ती लोकं अजून मोकळे फिरतायेत त्यामुळे तो आनंद मला अजून मिळाला नाही. कारण ते अजून मोकळे फिरणारे आत आले कसे? आपण विचारायला नको का प्रश्न? नाही आपल्या भारतात घुसून मारलंय ना आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट आहे. पण ते पंचवीस लोकं शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला. ते आलेच कसे? त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. हे तर यंत्रणेचं अपयश आहे. 

टॅग्स :PuneपुणेOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेIndiaभारतPakistanपाकिस्तान