शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रस्ते सुरक्षेचा भार ‘आरटीओ’ला पेलवेना, मनुष्यबळाअभावी कारवाई घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:08 AM

दरवर्षी उत्पन्नाची विक्रमी उड्डाणे घेणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला रस्ते सुरक्षेचा भार पेलताना नाकीनऊ येत आहे.

- राजानंद मोरेपुणे : दरवर्षी उत्पन्नाची विक्रमी उड्डाणे घेणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला रस्ते सुरक्षेचा भार पेलताना नाकीनऊ येत आहे. मनुष्यबळाअभावी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवरील कारवाई मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ते सुरक्षा अभियान राबविताना शासनाकडून या कार्यालयांना बळ दिले जात नसल्याने या अभियानाची केवळ औपचारिकता केली जात आहे.रस्ते वाहतूक सुरक्षितपणे होण्याच्या दृष्टीने आवश्यक वाहन परवाने, वाहन तपासणी, नोंदणी करण्याची मुख्य जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालयांवर आहे. यामध्ये राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. दरवर्षी निश्चित उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल तसेच वाहनांची नोंदणी करणारा विभाग म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. पण मागील काही वर्षांपासून या विभागाच्या सक्षमीकरणाकडे शासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पुणे विभागात पुण्यासह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, बारामती व अकलूज या कार्यालयांचा समावेश आहे. सर्वच कार्यालयांमधील मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. पुणे कार्यालयातील रिक्त पदांची संख्या अनुक्रमे ५८ पैकी २९ व ८५ पैकी ७८ एवढी आहे. इतर कार्यालयांचीही हीच अवस्था आहे. परिणामी, या कार्यालयांवर कामाचा प्रचंड ताण येत असून, प्रामुख्याने वाहन परवाने, योग्यता प्रमाणपत्र देणे व प्रशासकीय कामांशिवाय अन्य कामांवर मर्यादा आल्या आहे.पुणे कार्यालयाकडे तीन भरारी पथके असून, या पथकांमार्फत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण १० हजार ९४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर मागील वर्षी एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत केवळ ४ हजार ४६७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्येही सर्वाधिक कारवाई योग्यता प्रमाणपत्र तपासणीची आहे. मार्चअखेरपर्यंत कारवाईचा वेग वाढविला तरी मनुष्यबळाअभावी १० हजारांचा टप्पा गाठता येणे अशक्य आहे. वाहन निरीक्षकांच्या जागा अत्यंत कमी असल्याने नियमित काम करणेही कठीण होत आहे. त्यामुळे भरारी पथकांना पूर्णवेळ काम करता येत नाही, असे अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPuneपुणे