शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सेन्सॉर बोर्डाचा दुर्मिळ खजिना अभ्यासकांसाठी खुला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:54 IST

हे माहिती आहे का? की डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने 1924 मध्ये‘पूना रेडेड’ हा मूकपट निर्मित केला होता आणि त्याचे दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनी केले होते. 

पुणे : हे माहिती आहे का? की डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने 1924 मध्ये‘पूना रेडेड’ हा मूकपट निर्मित केला होता आणि त्याचे दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनी केले होते.  वरेरकरांनी या चित्रपटात मुघल सेनापती शाहिस्तेखान हा जेव्हा छत्रपती शिवाजीमहाराजांवर हल्ला करायला जातो, तेव्हा शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांच्या कपाळावर चंद्रकोर दिसते. शिवाजी महाराजांना शैतान कसं म्हणू शकतो? हा तर शिवाचा अवतार आहे अशा शब्दातं शिवाजीमहाराजांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारा प्रसंग समाविष्ट केला होता.  मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या पाशर््वभूमीवर साम्राज्यशाहीविरूद्धातील हे रूपक असल्याचे मानून बॉम्बे बोर्ड आॅफ सेन्सॉरने हा प्रसंग वगळून 15 आॅगस्ट 1924 ला डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनला सेन्सॉरचे प्रमाणपत्र दिले होते. अशा सेन्सॉर बोर्डाच्या जवळपास 2500 पानांच्या नोंदीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने अभ्यासक आणि संशोधकांसाठीसंकेतस्थळावर खुला केला आहे.          दिवंगत सिसिल बी डी मिले यांनी दिग्दर्शित केलेल्या ’द व्होल्गा बोटमन’ या अमेरिकन मूकपटाला देखील सेन्सॉरने कात्री लावली होती.रशियातील बोलशेविक क्रांतीशी संबंधित हा चित्रपट असून, तो वर्णद्वेष, हिंसाचार, लालसा आणि क्रूरता अशा गोष्टींना खतपाणी घालणारा असल्याने बॉम्बे बोर्ड आॅफ सेन्सॉरने या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यासनकार दर्शविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित अशा अनेक गोष्टींची माहिती या नोंदीमधून अभ्यासक आणि संशोधकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. 1920 ते 1950 दरम्यान बॉम्बे आणि बंगाल सरकारच्या राजपत्रामध्ये  स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित नोंदींचा उल्लेख देखील पाहायला मिळतो. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडे तपासणी आणि सर्टिफिकेटसाठी पाठविण्यात आलेल्या चित्रपटांच्या नोंदी आहेत. जवळपास या 2500 पानांच्या नोंदीएनएफएआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये चित्रपट तपासणी, रिळांची संख्या, कंपनीचे नाव, मूळचा देश, तपासणीची आणि सर्टिफिकेट दिल्याची तारीख या माहितीचा नोंदीमध्ये समावेश असल्याचेत्यांनी सांगितले.प्रकाश मगदूम,संचालक, एनएफएआय    ’’  स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट आणि चित्रपट सृष्टीशी संबंधित या नोंदी म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. ज्यांनास्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटांमध्ये रस आहे अशा जगभरातील चित्रपट संशोधकांना हा माहितीचा खजिना उपयुक्त ठरणार आहे.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकcinemaसिनेमा