शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या मैदानावर लावणी कार्यक्रमांना परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

पुणे : ‘कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीने लावणीचे कार्यक्रम पूर्णपणे बंद झाले आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. आता नाट्यगृहांमध्ये लावणीचे ...

पुणे : ‘कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीने लावणीचे कार्यक्रम पूर्णपणे बंद झाले आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. आता नाट्यगृहांमध्ये लावणीचे कार्यक्रम करायला परवानगी मिळाली आहे. त्याचप्रमाणे, यात्रा, जत्रांमध्ये खुल्या मैदानावरील लावणी महोत्सवांना परवानगी मिळावी,’ अशी अपेक्षा लावणी कलाकारांनी व्यक्त केली.

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळातर्फे २ जानेवारी रोजी ‘अहो नादच खुळा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यानिमित्ताने तब्बल दहा महिन्यांनी लावणी कलावंतांसाठी रंगमंचाचा पडदा उघडणार आहे. या पार्श्वभूमीवर लावणी लोककला निर्माता संघाचे उपाध्यक्ष शशिकांत कोठावळे, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, कलाकार संगीता लाखे आणि अर्चना जावळेकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी लावणी कलावंतांच्या समस्या, पुढील कार्यक्रमांचे नियोजन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

खुटेगावकर म्हणाल्या, ‘जत्रा, यात्रांमध्ये लावणीच्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, अद्याप त्या कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. ती परवानगी मिळाल्यास कार्यक्रम वाढू शकतील. कलाकारांचा उदरनिर्वाह होऊ शकेल.’ सध्या प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ‘प्रेक्षकांना कार्यक्रमात वैविध्य हवे असते. त्यामध्ये काही लावण्या, काही हिंदी गाणी असे बदल प्रेक्षकांच्या आवडीनुसार केले जातात. शासनाकडून लावणी कलावंतांना मानधनही मिळावे, अशी अपेक्षा आहे.’

---

सध्या नाट्यगृहांना परवानगी मिळाली असली तरी ५० टक्के प्रेक्षकच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. लावणीसारख्या लाईव्ह कार्यक्रमांना प्रेक्षकांना मागे बसणे रुचत नाही. आम्ही हॉटेलमध्ये एकत्र जातो, गाडीतून एकत्र प्रवास करतो, मग नाट्यगृहांमध्येच शेजारी का बसू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला जातो.

- शशिकांत कोठावळे