शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील पदार्थ खाताय, सावधान...!

By admin | Updated: August 18, 2015 03:37 IST

बाजूने वाहणारे दुर्गंधीयुक्त गटार, रोगराई पसरवणाऱ्या माशांचे घोंगावणे, अस्वच्छ कामगार अशा स्थितीत खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते उघड्यावर

सचिन देव, पिंपरी बाजूने वाहणारे दुर्गंधीयुक्त गटार, रोगराई पसरवणाऱ्या माशांचे घोंगावणे, अस्वच्छ कामगार अशा स्थितीत खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते उघड्यावर ठेवून विक्री केली जाते, हे विदारक वास्तव नेहरुनगर, संत तुकारामनगर, खंडोबा माळ मंदिर, आकुर्डी आणि डांगे चौक, थेरगाव या परिसरात पाहावयास मिळते आहे. आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असताना अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या विविध भागांत गलिच्छ ठिकाणी, अशुद्ध वातावरणात सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असून, या पदार्थांमुळे नागरिकांना विविध आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागांत काठे हातगाडी, तर कोठे स्टॉल, टपऱ्या लावून खाद्यपदार्थांची राजरोसपणे उघड्यावर विक्री केली जात आहे. अन्नपदार्थ झाकून ठेवण्याची कोणी दक्षता घेत नाही. विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने फक्त विक्रीचा परवाना दिला आहे.खंडोबा मंदिराच्या समोरच विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागल्या आहेत. विक्रेते उघड्यावरच वडापाव, समोसा, कचोरी, भजी विक्री करताना दिसून आले. कुठल्याही विक्रेत्याने पदार्थावर सुरक्षेच्या दृष्टीने झाकण ठेवलेले नव्हते, तर सर्वच हातगाड्यांच्या बाजूला कचऱ्याची घाण साचलेली दिसून आली. अत्यंत दुर्गंधीचे वातावरण या ठिकाणी दिसून आले. शहरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉलची पाहणी केली. अनेक ठिकाणी स्टॉलवर काम कारणारे कामगार धूम्रपान करणारे, तंबाखू , बिडी, सिगारेटचे व्यसन करणारे आढळून आले. एका ठिकाणी तर वडापाव बनविणारा कामगार एका हाताने तंबाखू चोळत होता, तर दुसऱ्या हाताने वडे तळत होता.