शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 14:57 IST

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत..

ठळक मुद्देशहरात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे.. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरीदेखील राज्य सरकारकडून याची दखल घेतली गेली नसल्याने शनिवारी ( दि.29) राज्य शासनाच्या विरोधात  भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

पुण्यातील सारसबाग मंदिर, ओंकारेश्वर मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घंटानाद, टाळ वाजवून तर काही ठिकाणी गोंधळ घालून देखील आंदोलन करण्यात आले.यावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. 

या आंदोलनाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपशहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अनेक भाजपा  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनाच्या वेळी राज्यसरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.       गिरीश बापट म्हणाले,राज्यात काही अपवाद वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार घ्यायला तयार नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीपासून धार्मिक स्थळांचे दर्शन घडलेले नाही.श्रावण महिन्यात देखील भाविकांनी संयम पाळत मंदिरांच्या दर्शनाचा हट्ट केला नाही. मात्र अजूनही मंदिरे खुल करण्यात येत नसल्यामुळे भाविकांची खूप मोठी नाराजी आहे. पण राज्य सरकारकडून भाविकांच्या भावनांची  कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.त्यामुळे भाजपकडून राज्यभर राज्य शासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन पुकारणात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन तरी राज्य सरकारने भाविकांना दर्शनासाठी त्वरित मंदिरे खुली करून द्यावी.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्धवा अजब तुझे सरकार, दार उघड उद्धवा दार उघड, पुरे झाले पुरे झाले, मंदिरांची दारे खुली करा यासारख्या घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार घंटानाद करत निषेध नोंदवण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाTempleमंदिरagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार