लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? अजित पवारांनी नियमच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:11 IST2025-01-26T17:11:37+5:302025-01-26T17:11:54+5:30

भिगवण येथील हॉटेल विश्वजितच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Only women with a monthly income of twenty thousand will get money from Ladki Bahin Yojana says Ajit Pawar | लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? अजित पवारांनी नियमच सांगितला

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? अजित पवारांनी नियमच सांगितला

भिगवण : लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार अश्या अफवा पसरविल्या जात आहेत परंतु ज्या महिलांचे उत्पन्न  वार्षिक २ लाख ४० हजार आहे म्हणजेच महिना २० हजार उत्पन्न अश्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार असून महिला धुनी,भांडी मोलमजुरी करतात अश्यांसाठी आहे. ज्यांचा ऊस दोनशे चारशे टन जातो ज्यांचे उपन्न जास्त आहे अश्या महिलांचे पैसे बंद होतील असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भिगवण येथील हॉटेल विश्वजितच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, काही बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत याची चौकशी सुरु असून यानंतरच उचित बोलता येईल. यावेळी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप गारटकर  माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर,बारामती अग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, दत्तकला संस्थेचेरामदास झोळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

विकासकामे करत करत असताना कामे दर्जेदार केली पाहिजेत ठेकेदारांचे लाड खपून घेतले जाणार नाहीत ठेकेदार जवळचा असू लांबचा असू जनतेच्या पैश्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे काल इंदापूर येथील कोर्टाच्या उद्घाटनाला गेलो होतो उद्घाटन झाल्यानंतर पार जायच्या टायमिंगला न्यायालयाच्या भिंतीवरील स्टाईलला निसटू नये यासाठी खिळे मारले होते हेच कार्यक्रमाच्या आधी दिसले असते तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायला कार्यक्रमातच सांगिलते असते.

Web Title: Only women with a monthly income of twenty thousand will get money from Ladki Bahin Yojana says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.