शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील फक्त दहा टक्के गतिरोधक शास्त्रीय पध्दतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:32 IST

या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघात होत आहे...

ठळक मुद्दे गतिरोधक तयार करण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मार्गदर्शक तत्व समिती गतिरोधकांमुळे  दुचाकी स्वरांना पाठ दुखी आणि मणक्याचे आजार गतिरोधकांचे अनेक प्रस्ताव कागदावरच

- माऊली शिंदे- 

पुणे : शहरामध्ये २ हजार ६०० पेक्षा जास्त गतिरोधक आहेत. यापैकी फक्त दहा टक्के गतिरोधक पालिका आणि पोलिसांच्या परवानगीने बनवले आहेत. इतर गतिरोधक अशास्त्रीय पध्दतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघात होत आहे.पालिकेने शहरातील विविध रस्त्यावर गतिरोधक तयार करण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समिती तयार केली आहे. ही समिती गतिरोधकांच्या प्रस्तावावर निर्णय घेते. इंडियन कॉंग्रेस रोडच्या नामांकनानुसार शास्त्रीयपध्तीचे गतिरोधक असावे. या नामांकनामध्ये गतिरोधकांची उंची आणि लांबी नमूद केलेली आहे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे बंधनकारक असते. शहरामधील विविध रस्त्यावर गतीरोधक तयार करण्याची मागणीचे प्रस्ताव या समितीमध्ये सादर केले जातात. त्यानंतर समिती गतिरोधकाबाबत निर्णय घेते. मात्र, गेल्या तीन वर्षामध्ये या समितीच्या बैठका झाल्या नाही. यामुळे गतिरोधकांचे अनेक प्रस्ताव कागदावरच आहे. गतीरोधक तयार करण्यासाठी मान्यता मिळत नसल्याने. राजकीय कार्यकर्ते आणि नागरीक स्वत: अशास्त्रीय पध्दतीने गतिरोधक तयार केले आहे. या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे  दुचाकी स्वरांना पाठ दुखी आणि मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. तसेच गाडीचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी पिवळे आणि काळे रबरी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. हे रबरी गतिरोधक काही महिन्यामध्ये तुटताय. त्यानंतर रस्त्यावर फक्त नट बोल्ट राहतात. या नटबोल्ट वरून वाहन गेल्यानंतर चाक पक्चंर होतात. गतीरोधकांमुळे अपघात होत आहे. महापालिकेची गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समितीच्या बैठका होत नाही. गतिरोधकांबाबत निर्णय घेतले जात नाही. यामुळे या समितीच्या सदस्या कनिझ सुखराणी यांनी या समितीचा राजीनामा दिला आहे.............गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समितीच्या बैठका वेळेवर होत नाही. ऐनवेळी बैठका रद्द केल्या जातात. यामुळे शहरातील गतिरोधकांबाबत निर्णय घेतला जात नाही. ही समिती फक्त नाममात्र राहिली आहे. समितीचे कामकाज होत नसल्याने नागरीक स्वत: अशास्त्रीय पध्दतीने गतीरोधक तयार करतात. ज्यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे. ज्या उद्देशासाठी समितीची स्थापना केली आहे. ते उदिष्ट पुर्ण होत नसल्याने मी या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा आयुक्तांकडे  दिला आहे.  कनिझ सुखराणी, नागरी चेतना मंच, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी