शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन वीज बिल भरणा मीटर फास्ट : पुणे परिमंडळ राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 21:02 IST

आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्यांच्या संख्येत पुणेकरांनी आघाडी घेत राज्यातील आॅनलाईन भरणा करणाऱ्या मंडलांमध्ये पहिले स्थान पटाविले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन ग्राहक संख्या पोहोचली साडेनऊ लाखांवरतब्बल १७६ कोटी ९४ लाख रुपये आॅनलाईनच्या माध्यमातून महावितरणच्या तिजोरीत जमा

पुणे : आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्यांच्या संख्येत पुणेकरांनी आघाडी घेत राज्यातील आॅनलाईन भरणा करणाऱ्या मंडलांमध्ये पहिले स्थान पटाविले आहे. पुणे परिमंडलात आॅनलाईन वीज बिल भरणाऱ्यांची संख्या ९ लाख ५२ हजार झाली असून आॅगस्ट महिन्यात तब्बल १७६ कोटी ९४ लाख रुपये आॅनलाईनच्या माध्यमातून महावितरणच्या तिजोरीत जमा झाले आहेत. राज्यात सद्य:स्थितीत सुमारे ४५ लाख लघुदाब वीजग्राहक वीजबिलांचा दरमहा आॅनलाईन भरणा करीत आहेत. यात पुणे परिमंडलातील ९ लाख ५२ हजार (२१ टक्के) वीजग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक असून, त्या नंतर भांडूप व कल्याण परिमंडलात सुमारे पावणेसात ते सात लाख वीजग्राहक वीजबिलांचा आॅनलाईन भरणा करत आहेत. आॅगस्ट २०१८मध्ये पुणे शहरातील ५ लाख ६४ हजार वीज ग्राहकांनी १०० कोटी ४१ लाख, पिंपरी चिंचवड शहरातील २ लाख ७१ हजार वीजग्राहकांनी ५१ कोटी रुपये, तसेच मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील १ लाख १७ हजार वीज ग्राहकांनी २५ कोटी ४८ लाख रुपयांचा ह्यआॅनलाईनह्ण भरणा केला आहे.लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्यासाठी www.ZÔhÔdiscoZ.हे संकेतस्थळ असून जून २०१६ पासून मोबाईल अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा आॅनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट आणि डेबीट कार्डसह मोबाईल वॅलेट, तसेच कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या शिवाय भरलेल्या रक्कमेच्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांचे बिल देखील भरता येत आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अपवरून वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.-------------------------आॅनलाईन वीजभरणा झाला नि:शुल्कक्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे बिल भरण्यासाठी आॅनलाईन भरणा करण्याचे पर्याय आता नि:शुल्क करण्यात आले आहेत. याआधी नेटबँकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा आॅनलाईन भरणा करण्यासाठी पाचशे रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आॅनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क करण्यात आला आहे. 

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणonlineऑनलाइन