शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

HSC/12th Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:03 IST

विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार असून त्यावर प्राचार्यांची सही व शिक्का घेणे आवश्यक

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारपासून (दि. १०) उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. मात्र, या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांची सही व शिक्का घेणे आवश्यक आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यंदाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करण्याच्या उद्देशाने, दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा ८ ते १० दिवस आधी घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘ॲडमिट कार्ड’ या लिंकद्वारे डाउनलोड करता येतील. ज्या आवेदनपत्रांना पेड (paid ) असे स्टेट्स प्राप्त झाले आहे. त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस ॲडमिट कार्ड' या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. एखाद्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र