शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलममधून कांद्याचे पदार्थ गायब

By admin | Updated: August 24, 2015 02:46 IST

सध्या कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. शुक्रवारपर्यंत कांद्याचा भाव सत्तरीच्या वर गेला होता. त्यामुळे ऐरव्ही दोन ते पाच रुपये प्रतिकिलो जाणारा कांदा आता ७० ते ७५ रुपये

पळसदेव : सध्या कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. शुक्रवारपर्यंत कांद्याचा भाव सत्तरीच्या वर गेला होता. त्यामुळे ऐरव्ही दोन ते पाच रुपये प्रतिकिलो जाणारा कांदा आता ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आसू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही हॉटेल, ढाबे या ठिकाणी जेवण्यासाठी गेल्यास कांदा हमखास दिला जात होता. मात्र, कांद्याच्या वाढत्या दरामुळे हॉटेलचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कांद्याऐवजी काकडी किंवा मुळा दिला जात आहे. कांदा हे पीक कमी दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती मिळवून देणारे पीक ओळखले जाते. परंतु, मागील ५ ते ७ वर्षाचा विचार केल्यास कांद्याला १० ते १५ रुपयांच्या पुढे दर मिळालेला नाही. त्यामुळे कांदा पिकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी वेळोवेळी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी कांद्याला योग्य बाजारभाव नसल्यास पाचटाची आडी करून किंवा पत्र्याचे शेड उभारून कांद्याची साठवणूक करीत असत. मात्र, कांदा हा नाशवंत पीक असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातच अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी, असे गणित निर्माण झाल्याने कांद्याच्या दराने उसळी मारली आहे. एरव्ही अल्प बाजारभावात जाणारा कांदा आता मात्र ‘भाव’ खाऊ लागला आहे. दररोज कांद्याचे दर वाढतच असल्याने ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा आहे. ते शेतकरी खूष झाले आहेत. जणू काही आपल्याला लॉटरीच लागली असल्याच्या बोलकथा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या तोंडून उमटत आहेत. शुक्रवारी कांद्याला दर प्रतिक्विंटल ७४०० पर्यंत गेल्याने आणखी कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत. सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी कांदा नेला जात आहे. दरम्यान कांद्याचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आसू येत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनात वापरला जातो. मात्र, कांद्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने कांदा विकत घेणे अवघड बनले आहे. (वार्ताहर)