शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Onion Price : आवक वाढल्याने कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:09 IST

राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत नवीन कांद्याचे उत्पादन चांगले झाले

मंचर : आवक वाढल्याने तसेच कमी प्रतीचा कांदा विक्रीसाठी आल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव ढासळले आहेत. मंगळवारी दहा किलो कांदा २९० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी १० किलोला २९० रुपये, असा बाजारभाव मिळाला. १७ हजार ८४ पिशवी कांद्याची आवक झाली आहे. तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत नवीन कांद्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे आणि तो कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने कांद्याचे बाजारभाव कमी झाले असून, बाजारभाव २५ ते ३० टक्के कमी झाल्याची माहिती व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी दिली. मंचर बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली असून, चांगल्या बाजारभावाच्या आशेने शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहे. अनेक वेळा काढणी लवकर केल्याने कांद्याची प्रतवारी नीट राहत नाही, त्यामुळेही बाजारभाव कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.कांद्याचे प्रतिदहा किलोचे दर पुढीलप्रमाणे :सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा रुपये २८० ते २९० रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये २५० ते २७० रुपये, सुपर मीडियम २ नंबर कांद्यास २२० ते २५० रुपये, गोल्टी कांद्यास ८० ते १५० रुपये, बदला कांद्यास ४० ते १०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. कांद्याचे बाजारभाव कमी होऊ लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. दिवसेंदिवस भांडवली खर्च वाढत असून, बाजारभाव कमी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला आहे.                        

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रonionकांदाMarketबाजारMarket Yardमार्केट यार्ड