शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:04 IST

कांदा, बटाटा, लसून, प्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळ्याच्या दरामध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे़.

ठळक मुद्देआवक आणि मागणी वाढल्याने दर वाढमागणीच्या तुलनेत आवक कमी राहील्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये तरकारी विभागात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, मागणी देखील वाढ झाल्याने कांदा, बटाटा, लसून, प्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळ्याच्या दरामध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे़. तर अन्य भाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती भाजीपाल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील तरकारी विभागात रविवार (दि.२१) रोजी  १४० ते १५० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून १ ते २ टेम्पो शेवगा,  हिमाचल प्रदेशातून ४ ते ५ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरातमधून कोबी ३ ते ४ ट्रक, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कैरी, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची पाच ते साडेपाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १००० ते १२०० पोती, टॉमेटो पाच ते साडेपाच हजार पेटी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ३ ते ४ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, वांगी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते  १० टेम्पो, तांबडा भोपळाची १० ते १२ टेम्पो, कांदा ६० ते ७० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ५० ते ५५ ट्रक इतकी आवक झाली.-पालेभाज्या तेजीतच मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्या प्रमाणेच स्थिर आहे. मात्र आवक आणि मागणी समप्रमाणात असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच , पण स्थिर होते़.. मार्केटयाडार्तील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीरीची सव्वा लाख जुडी, मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी राहील्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच आहेत़...पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १३००-१६००, मेथी : ६००-१०००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : १५०-२००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ६००-८००, पालक : ६००-८००.

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्ड