शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कांदा खातोय भाव; प्रतिकिलो ५० रुपयाने विक्री..!

By admin | Updated: August 10, 2015 02:43 IST

गेल्या तीन महिन्यांत घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २०० टक्क्यांनी वाढले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जुन्नर कृषी

पुणे/जुन्नर : गेल्या तीन महिन्यांत घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २०० टक्क्यांनी वाढले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जुन्नर कृषी बाजार समितीत २ मे रोजी क्विंटलमागे १ हजार १०१ रुपये असलेला कांद्याचा सरासरी दर आज ४ हजारांवर पोहोचला. पुणे मार्केड यार्डात दहा किलोला तो ४२0 रुपयांवर तर चाकणला ३८0 पर्यंत गेला. कांद्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. या भाववाढीमुळे शेतकरी काहीसे सुखावले आहेत. हा दर १ नंबर कांद्याला मिळत आहे. मात्र, किरकोळ बाजारात खराब कांदाही ५० रुपये किलोने विकला जात असल्याने ग्राहकांची मात्र लूट होत आहे.साधारणपणे मार्च महिन्यात उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच आॅगस्टनंतर नवे पीक येते. उन्हाळी कांदा टिकावू असल्याने शेतकरी त्याची साठवणूक करतात व तो ठराविक अंतराने बाजारात आणतात. मात्र, यंदा देशात गारपीट व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याला फटका बसला. परिणामी उत्पादन घटले. त्यातही साठवणूक केलेल्या कांद्याची प्रत खराब झाली. महाराष्ट्रानंतर कांद्याचे मोठे उत्पादन होणाऱ्या आंध्र प्रदेश व कर्नाटकात यंदा अपेक्षित पीक आले नाही. त्यामुळे एकीकडे जूननंतर बाजारात मागणी वाढत असताना पुरवठ्यात मात्र वाढ झाली नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१४ च्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत आवक घटली नसताना भाव मात्र दुप्पट झाले आहेत. आॅगस्ट २०१४ मध्ये क्विंटलमागे असलेला सरासरी १ हजार ५०६ रुपये दर आता सरासरी ३ हजार ४०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर गेल्या काही दिवसांत ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एकूणच यंदा नवीन लागवडही खोळंबल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.गवार, भेंडीच्या भावात वाढ/वृत्त ४