पिंपरी : चित्रपटगृहात शांत बसण्याची विनंती केल्यामुळे एका तरुणावर हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेआठ ते पावणेदहाच्या सुमारास चिंचवड येथील आयनॉक्स थिएटर, एलप्रो मॉल येथे घडली.चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अभिषेक प्रफुल्ल देशपांडे (वय २९, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकिब जावेद निसार पटेल आणि त्याची पत्नी (वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अभिषेक, त्याची पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत असताना, त्याच्या मागील सीटवर बसलेल्या संशियताला त्याने ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि ‘शांत बसा’ अशी विनंती केली. यामुळे चिडून त्या व्यक्तीने अभिषेकची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि खाली पाडले.
स्टोरी आधी सांगू नका म्हणत शांत बसण्यास सांगितल्याने एकास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:21 IST