शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

" एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरू अन् दुसरीकडे आजीबाईंनी उघडले अचानक डोळे.." बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 4:03 PM

आजीबाई गेल्याची दुःखद वार्ता त्यांनी नातेवाईकांना फोनकरून कळवली...

सोमेश्वरनगर : कोरोनाबाधित आजीबाईंची प्रकृती खालावली, शरीर हालचाल करेनासा झाले, डोळेही उघडेना..शेवटी मग आजीबाईंचे निधन झाल्याचे समजुन नातेवाईकांना फोन केले. अंत्यसंस्काराची तयारी झाली. मात्र, थोड्याच कालावधीने आजीबाईंनी डोळे उघडले...अन् कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचे एका क्षणात आनंदात रूपांतर झाले. हा ज्यांना ज्यांना आजीबाई गेल्याची दुःखद वार्ता कळवली होती त्यांना परत आजीबाई जिवंत असल्याचे फोनकरून कळवावे लागले.  

बारामती तालुक्यातील मुढाळे येथे सोमवारी (दि. १०) हा प्रकार घडला. लिलाबाई चव्हाण वय ७६ (बदललेले नाव) यांना गेल्या वीस दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. यामुळे आजीबाई विलगीकरणात होत्या. वृद्धापकाळामुळे शरीर प्रकृती साथ देत नव्हती. हालचाल करता येत नव्हती. यामुळे घरातील सदस्यांनाही सेवा कशी करावी याबाबत कोडे पडले होते. संपर्कात जावे तर बाधा होईल. यामुळे थोडे अंतर राखून सेवा सुरु होती. 

गेल्या दोन दिवसात प्रकृती अधिक खालावली आणि आजीबाई डोळे सुद्धा उघडत नाहीत असे पाहून घरातल्या सदस्यांनी बारामतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दवाखान्यात दाखल करावे तर बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे गाडीतल्या सदस्यांना वाटले आजींचे निधन झाले आहे आता थेट घरी घेऊन जावं. त्यामुळे तेथूनच पाहुण्यांना फोन केले. निधन वार्ता कळवली .गाडी घरी आली आणि अंत्यसंस्काराची तयारी झाली. कोरोनाबाधित असल्यामुळे फार असं कोण जवळ गेला नाही. आजुबाजुला नातेवाईकांची आर्त हाक ऐकुन आजीबाईंनी डोळे उघडले. आणि सर्वांना आश्चर्याचा एकच धक्का बसला.

कोरोनाच्या संसर्गामुळे एकमेकांना स्पर्श करणे धोक्याचे ठरत असल्याची भावना सर्वांच्या मनात घर करून बसल्याने असे प्रसंग ओढावत आहे. कोरोनाच्या धास्तीने पोटची अपत्यही जवळ येत नाहीत. परिणामी मृत्यूची खात्री सुद्धा करणे धोक्याचे वाटत आहे. यातुन कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार म्हणजे एक कोडंच बनले आहे. लवकर विधी करून मोकळे व्हावं....ही घाई अंगलट आली असती. जिवंतपणी सरणावर ठेवण्याच्या तयारीला कोरोनाची भीतीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. ----------------------

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू