शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एक जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 13:10 IST

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला...

कुरकुंभ (पुणे) : मळद येथे शुक्रवारी ( दि. ७ ) रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या भुयारी मार्गावर लोखंडी सुरक्षा कठडे बसविणाऱ्या कंत्राटदाराच्या उभ्या असलेल्या महेंद्र बोलेरो पीकअपला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. मळद येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गावरील लोखंडी सुरक्षा कठडे बसविण्याचे दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. हे काम संपून कंत्राटदाराचे कामगार व पीकअप( क्रमांक एमएच. ४२ एम.४९२६) चालक रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून चहा पिण्यासाठी गेले होते. हे पीकअप रस्त्यावरच कडेला उभे असल्याने पाठीमागून भरधाव वेगात जाणारी (एमएच.१४ एफसी.१७४८० कार पीकअपला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर कार मधील अन्य एक व पीकअपमधील एक कामगार असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत व जखमी झालेले व्यक्तीची नावे व पत्ता रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. जखमींना उपचारासाठी तातडीने दौंड मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारच्या पुढील बाजूचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर लोखंडी सुरक्षा कठड्याचे साहित्य महामार्गावर पसरले होते. त्यामुळे सोलापूर-पुणे मार्गाची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातSolapurसोलापूर