पुण्यात मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 02:57 PM2019-06-15T14:57:14+5:302019-06-15T15:00:42+5:30

वृद्ध व्यक्ती दत्तात्रय गवळी हे रस्त्याच्या दिशेने पळत असताना मधमाशांनी त्यांच्या चेहऱ्यावर चावा घेतला व नाका-तोडांत मधमाशा गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

One person death in bees attack in Pune ; Six people injured | पुण्यात मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी

पुण्यात मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी

Next

पुणे : वानवडीतील गवळी-धाडगेनगर येथील गवळी यांच्या 'वृंदावन' इमारतीमध्ये दशक्रियाविधी निमित्त भोजनाचा कार्यक्रम सुरु असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी काहीजण जीव मुठीत घेऊन पळून लागले. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वृद्ध व्यक्तीला मधमाशा चावल्याने जीव गमवावा लागला तर काहीजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी वानवडी येथे घडली. दत्तात्रय देवराम गवळी( वय ७६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

वृद्ध व्यक्ती दत्तात्रय गवळी हे रस्त्याच्या दिशेने पळत असताना मधमाशांनी त्यांच्या चेहऱ्यावर चावा घेतला व नाका-तोडांत मधमाशा गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मधमाशा चावल्याने दत्तात्रय गवळी या रुग्णाला जेव्हा दवाखान्यात घेऊन आले तेव्हा ते दवाखान्यात येण्याअगोदरच मृत अवस्थेत होते. त्यामुळे पोलीस पंचनामानंतर त्यांचे शव हे शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्युचे खरे कारण समजू शकेल. बाकी रुग्णांवर प्रथमोपचार करुन सोडण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने मधमाशांच्या पोळावर उपाययोजना करणे गरजेचे..
तसेच आपत्कालीन सेवांमध्ये अशाही घटनेवर उपाय योजना असावी जेणेकरून कोणतीही दु:खद घटना होण्यापासून रोखता येईल. डॉ. उज्वल भामरे.

...........................

शेजारील सिल्व्हर क्रेस्ट सोसायटी मधील पाचव्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या गॅलरीमध्ये असलेल्या मधमाशांचे पोळ होते. हा फ्लॅट बंद असल्याने त्या मधमाशांच्या पोळाकडे दुर्लक्ष होत आहे. अचानक आलेल्या मधमाशांमुळे सर्वांची धावपळ सुरु झाली. अंगावर घोंगडी घेऊन माशा हकलण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच १०१ ला फोन केला परंतु, अशा प्रकारच्या घटनेत कोणतेही उपाय योजना नाही असे सांगण्यात आले. एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने अशा घटनांसाठी सुद्धा उपाययोजना आखाव्यात. जगन्नाथ खोपकर व नितीन गवळी, 

Web Title: One person death in bees attack in Pune ; Six people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.