शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

खूनप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक, वारज्यातील आठवड्यापूर्वीची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:19 AM

वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अल्प माहितीच्या आधारे माग काढत तेलंगणातील नक्षलग्रस्त भागात जाऊन अटक केली़

पुणे : वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अल्प माहितीच्या आधारे माग काढत तेलंगणातील नक्षलग्रस्त भागात जाऊन अटक केली़गोपाळ बन्सी राठोड (वय २५, रा़ सहयोगनगर, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ मजूर कविता राठोड २९ डिसेंबर रोजी कामावरून घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर तिचा पती तारिया फुलसिंग राठोड (वय ३०, रा़ विठ्ठलनगर, वारजे) यांनी ३० डिसेंबरला पोलीस ठाण्यात हरविली असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी वारजे येथे आरएमडी कॉलेजच्या मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या ओढ्यातील एका पाईपमध्ये महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता़ तो कविता राठोडचा असल्याचे निष्पन्न झाले़ वारजे पोलिसांनी याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केल्यावर तिचे गोपाळ राठोड याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली़ गोपाळ राठोड मजुरीकाम करीत असे़ वारजे येथील पुलाखालील मजूर अड्ड्यावर तो येत व ठेकेदाराकडे काम करीत असे़ त्यातूनच त्याची कविताबरोबर ओळख झाली होती़ त्यादिवशी गोपाळ व कविता आरएमडी कॉलेजशेजारील ओढ्याच्या कट्ट्यावर बसले होते़ दुसºयाशी संबंध असल्यावरून त्यांच्यात भांडणे झाली़ त्यात गोपाळने तिला ढकलल्याने ओढ्यात पडली व तिचा मृत्यू झाला़ गोपाळने तिला पाइपमध्ये कोंबले व तेथे असलेला कडबा, फळकाटे, प्लॅस्टिक कागद व बारीक लाकडे टाकून तिला पेटवून दिले होते़ त्यानंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील बेलखंड या मूळ गावी गेला़ सीसीटीव्ही आणि अन्य काही किरकोळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आठवडाभरात संशयित आरोपी गोपाळ राठोड याला तेलंगण-आंध्र प्रदेश बॉर्डरवरील नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक एस़ एन. धावडे, मॅगी जाधव, संजय दहीभाते, नितीन जगदाळे यांनी केली़

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPuneपुणे