शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे हातचलाखीने एटीएमधारकांना गंडविणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 19:40 IST

अनेक एटीएम सेंटर्समधून पैसे काढायला आलेल्या एटीएमधारकांना हातचलाखीने फसवून पैसे काढणाऱ्या ठगाला अटक केली आहे.

ठळक मुद्देचाकण पोलिसांची कारवाई : ८७ एटीएम कार्डसह आरोपीला अटक 

चाकण : परिसरातील अनेक एटीएम सेंटर्समधून पैसे काढायला आलेल्या एटीएमधारकांना हातचलाखीने फसवून पैसे काढणाऱ्या ठगाला चाकणपोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून जवळपास ८७ एटीएम कार्ड्स पोलिसांनी जप्त केली आहेत.   रोहित ओमशंकर मधुकर शर्मा (वय २५, रा. धर्मा निवास, कोणगाव, कल्याण, जि. ठाणे, मूळ रा. मधुबनी, पूर्णिया, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी उमेश प्रमोद शितोळे (वय २४, रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) हे कोहिनूर सेंटरमधील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी बाजुला उभा असलेला आरोपी रोहित याने पैसे काढून देण्याचा बहाणा करून स्टेट बँकेचा पिन नंबर पाहून हातचलाखी करून फिर्यादीच्या एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून स्वत:जवळील स्टेट बँकेचे दुसरे एटीएम कार्ड फिर्यादीला देऊन निघून गेला. यावेळी कार्ड बदलल्याचे लक्षात येताच त्यांनी चाकण पोलिसांना फोनवरून माहिती दिली. चाकण पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीचा माग घेतला. तो चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाई मळ्याच्या हद्दीत दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एसबीआय बँकेचे १७, युनियन बँकेचे ८, अ‍ॅक्सिस बँकेचे ४, बँक आॅफ बडोदाचे ६, बँक आॅफ इंडियाचे ६, बँक आॅफ महाराष्ट्राचे २ व इतर वेगवेगळ्या बँकांचे मिळून एकूण ८७ एटीएम कार्ड्स सापडले. या आरोपीने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबाबत त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  चौकटआरोपी रोहित शर्मा याच्याविरोधात अशा प्रकारे फसवणुकीचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लोकांचे पैसे काढून देतो, असा बहाणा करून एटीएम कार्डचा पिन नंबर पाहून नंतर लोकांना परत दुसरेच एटीएम कार्ड देऊन लोकांकडून घेतलेल्या एटीएममधून पैसे काढून लोकांची फसवणूक करण्याची त्याची पद्धत आहे. चौकट ——-आपले एटीएम कार्ड पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नये, एटीएमचा पिन नंबर कोणाला सांगू नये, तसेच एटीएममध्ये पिन नंबर टाकताना कोणास दिसणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन चाकण पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :ChakanचाकणatmएटीएमCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक