९१ लाखांची खंडणी मागणा-या पापा इनामदार टोळीतील एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:27+5:302021-06-26T04:09:27+5:30
पुणे : कोंढव्यातील जागेवर ताबा मारून सर्व सेटल करून देण्यासाठी तब्बल ९१ लाखांची खंडणी मागणा-या पापा इनामदार ...

९१ लाखांची खंडणी मागणा-या पापा इनामदार टोळीतील एकाला अटक
पुणे : कोंढव्यातील जागेवर ताबा मारून सर्व सेटल करून देण्यासाठी तब्बल ९१ लाखांची खंडणी मागणा-या पापा इनामदार टोळीतील एकाला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. मुसा कमरूद्दीन इनामदार (वय ४०, रा. कोंढवा बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या मित्राची कोंढवा परिसरात ९१ गुंठे जागा आहे. संबंधित जागेवर पापा नबी इनामदार, मुसा कमरुद्दीन इनामदार, रूपचंद भीमाजी गजरे, रफिक इनामदार, अयाज अब्दुल रेहमान शेख सर्व (रा. कोंढवा) यांनी ताबा मारला होता. हा ताबा सोडविण्यासाठी आणि सर्व सेटल करून देण्यासाठी प्रतिगुंठा १ लाखाप्रमाणे ९१ लाख रुपयांची खंडणी टोळीने तक्रारदाराकडे मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पथकाने आरोपी मुसा इनामदार याला अटक केली आहे. त्याचे साथीदार आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, अमोल पिलाणे, भूषण शेलार, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.
----------------------------------------------------------------------