लोणीकंद येथे दगडाने ठेचून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:53 IST2018-04-19T18:53:48+5:302018-04-19T18:53:48+5:30
लोणीकंद येथे खंडोबा माळ मोकळ्या जागेत दगडाने ठेचलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

लोणीकंद येथे दगडाने ठेचून एकाचा खून
लोणीकंद : लोणीकंद येथे खंडोबा माळ मोकळ्या जागेत दगडाने ठेचलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह पीएमपी खात्यातील चेकर पदावर काम करणारे माजी निवृत्त अधिकारी हनुमंत श्रीराम नलावडे (वय- अंदाजे ६५ ,रा.हडपसर,भेकराई नगर) यांचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही घटना उघडकीस आली गुरुवारी सकाळी १२ वाजता उघडकीस आली आहे. मात्र, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मुलामुळे मृतदेहाची ओळख पटली. खुनाची माहिती समजताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.