शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पुणे महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 20:42 IST

पुणेकरांना दिलासा; होणार नाही कोणतीही दंड आकारणी

ठळक मुद्देऑनलाईन व्यवहाराद्वारे पुणेकरांनी २८० कोटी रुपयांचा कर केला जमा

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मिळकत कराचा भरणा करण्याकरिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप मिळकत कर भरु न शकलेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची दंड आकारणी केली जाणार नाही. कर भरणा करण्याची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिकेचे २०२०-२१ हे आर्थिक वर्ष मार्चमध्ये सुरु झाले. स्थायी समितीने मुख्यसभेसमोर यंदाचे सात हजार कोटींचे अंदाजपत्रकही सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये विविध योजनांमधून जवळपास एक हजार कोटींनी उत्पन्न वाढविण्याची ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली होती. गेल्या वर्षी मिळकत कर भरण्याकरिता ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या काळात ६५० कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला होता. यंदा कोरोनामुळे मार्चमध्येच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मिळकत कर जमा होण्यात अडचणी आल्या आहेत. त्यातही ऑनलाईन व्यवहाराद्वारे पुणेकरांनी २८० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे.अनेकांना अद्यापही मिळकत कर भरणे शक्य झालेले नाही. इंटरनेटला पुरेसा स्पीड मिळत नसल्याने ऑनलाईन कर भरणा करण्यातही अडचणी येत आहेत. यासोबतच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना कर भरणे अडचणीचे होत आहे. त्यातच ३१ मे ही कर भरणा करण्याची शेवटची तारीख असल्याने नागरिक ही मुदत वाढवून देण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे महापालिका कर भरणा करण्याकरिता मुदत वाढवून देण्याचा विचार करीत आहे. यावर मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.======महापालिका हद्दीतील १० लाख ५७ हजार ७१६ मिळकतींमधून १ हजार ५११.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या ९ लाख १३ हजार ८५५ इतकी असून त्यांच्याकडून १ हजार ३६५ कोटी २४ लाख रुपये तर नवीन समाविष्ट ११ गावांमधील १ लाख ४३ हजार ८६१ मिळकतींमधून १४६ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.========१ एप्रिल ते २८ मे या काळात २ लाख ३३ हजार पुणेकरांनी २८० कोटींचा भरणा केला आहे. यातील २ लाख ९ हजार ५६४ नागरिकांनी २२३ कोटी ४३ लाखांचा कर जमा केला आहे. तर, ११ हजार २३२ मिळकतधारकांनी ३६ कोटी ७० लाखांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे. तर ९ हजार ३११ मिळकतधारकांनी ८ कोटी ३४ लाख रुपयांचा कर रोखीने भरला आहे. पालिकेने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रावर ११ मे ते २८ मे या काळात २० हजार १७२ मिळकतधारकांनी ४६ कोटी ६२ लाख रुपयांचा कर जमा केला आहे.=========पुणेकरांना लॉकडाऊनमुळे मिळकत कर भरणा करण्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत पुणेकरांनी ३०० कोटींच्या आसपास कर भरला आहे. त्यांची अडचण अनेकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. पुणेकरांचा विचार करुन मिळकत कर भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा विचार सुरु आहे. मंगळवारच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय होईल.- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती=====गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता ३१ मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी ३१ मेपर्यंत ६५० कोटींचा कर जमा झाला होता. पुणेकरांना कर भरणा करण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाईन व्यवहार वाढल्याने संकेतस्थळावरही ताण आला आहे. त्यामुळे स्थायी समितीने मुदतवाढ दिल्यास कर भरणा वाढण्यास मदतच मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल.- विलास कानडे, प्रमुख, कर संकलन व कर आकारणी विभाग========महापालिकेच्या संकेतस्थळावरील मिळकत कर भरण्याच्या पेजवर प्रचंड ताण आल्याने शनिवारी हे पेजच बंद पडले होते. ऑनलाईन कर भरणा करण्याकरिता हे पेज ओपन करताच  'विल बी बॅक इन फ्यू अवर्स'असा मेसेज दिसत होता. त्यामुळे अनेकांना कर भरता आला नाही. याबाबत विभाग प्रमुख विलास कानडे यांच्याशी संपर्क साधला असता, संकेतस्थळावरील ताण वाढल्याने आधी नागरी सुविधा केंद्रांवरील भरणा करुन घेण्याकरिता काही काळासाठी संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले होते. ते नंतर सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTaxकर