शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल हेल्थ कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच खासगी शाळांतील ३ ते १४ वयोगटातील ...

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच खासगी शाळांतील ३ ते १४ वयोगटातील जवळपास १० लाख मुलांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी डिजीटल हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांची जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून दोनदा तपासणी केली जाणार आहे. या माध्यमातून लहान मुलांमध्ये पसरलेल्या आजारांची माहिती एकत्र केली जाणार असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ञ्ज डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्यातील हा एकमेव असा प्रकल्प ठरणार असून साधारण मार्च महिन्यात याची सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी जवळपास १ हजार २२८ मुले कुपोषित आढळली होती. त्यात हवेली, खेड, इंदापूर आणि जुन्नरमध्ये सर्वाधिक कुपोषित मुले होती. यामुळे मुलांमध्ये येणाऱ्या आजारांची माहिती तसेच त्यावर उपाययोजना करण्यासोबतच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी ही डिजीटल हेल्थ कार्ड योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकमतला सांगितले. यासाठी अॅप तयार करण्याचे काम सुरू आहे त्या माध्यमातून ही योजना जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

जिल्ह्यातील जवळपास ३ हजारपेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणाड्या आणि खाजगी शाळेतील मुलांना हे हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. त्यांच्यावर आरोग्य सेवकांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे. महिन्यातून दोनदा शाळेच्या पहिल्या सत्रात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, जिल्हा रूग्णालय तसेच उपजिल्हा रूग्णालयात ही तपासणी होणार आहे. यासाठी ४३० आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्यामार्फत मुलांचे आरोग्य तपशील गोळा केले जाणार आहे. रेकॉर्ड ठेवतात आणि त्यांना आवश्यक उपचार दिले जाणार आहे. दोन महिन्यांत एकदा तरी त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांशी जोडलेले कर्मचारी व डॉक्टर यांचीही यासाठी मदत मिळणार आहे.

चौकट

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा ट्रेंड तपासण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी चर्चा

मुलांच्या आरोग्य तपासणी दरम्यान त्यांना होणाऱ्या विविध आजारांचा खुलासा होणार आहे. साधीचे आजार, त्वचारोग त्यासोबतच अनेक आजारांचा असलेल्या ट्रेंडची माहिती शोधण्यासाठी तसेच त्यानुसार उपचार पद्धती समजण्यासाठी मिळालेल्या आरोग्याच्या आकडेवारीचे विश्लेषण करून त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी चर्चा झाली आहे.

या हेल्थ कार्ड योजनेतून मुलांना होणाऱ्या विविध आजारांवर देखरेख ठेवली जाणार आहे. त्यानसुार त्यांना शास्त्रशुद्ध वैद्यकीय उपचार केले जाणार आहे. त्यांच्या आरोग्याच्या चार्टवर त्यांना उपचार दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, खासगी व शासकीय शालेय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मार्चच्या पहिल्या आठवड्यात देण्याची आमची अपेक्षा आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी