लोणी काळभोर येथे गॅस एजन्साचे शटर उचकटून एक लाख लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 08:32 PM2018-08-08T20:32:24+5:302018-08-08T20:33:32+5:30

थेऊर (ता.हवेली ) येथील गॅस एजन्सीचे शटर उचकटून चार अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७ हजार १४४ रुपये चोरून नेल्याची घटना घडली.

One lakh theft from gas agency shop at Loni kalbhor | लोणी काळभोर येथे गॅस एजन्साचे शटर उचकटून एक लाख लंपास 

लोणी काळभोर येथे गॅस एजन्साचे शटर उचकटून एक लाख लंपास 

Next
ठळक मुद्देसीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद : अज्ञात चोरट्यांविरोधांत फिर्याद

लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली ) येथील गॅस एजन्सीचे शटर उचकटून चार अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७ हजार १४४ रुपये चोरून नेल्याची घटना घडली. सीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. या चोरीप्रकरणी अमोल तात्यासाहेब काळे (रा. भिमनगर जवळ, थेऊर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काळे यांची थेऊर येथे गॅस एजन्सी असून तेथे जमा होणारी रक्कम ते दोन टप्प्यांत बँकेत भरतात. ६ आॅगस्ट रोजी जमा झालेली रक्कम एजन्सीचे व्यवस्थापक गायकवाड यांनी सकाळी १० - ३० वाजण्याच्या सुमारास बँकेत जमा केली. त्यानंतर दिवसभर जमा झालेली रक्कमेचा भरणा त्यांनी दुपारी ३ - ३० वाजण्याच्या सुमारास बॅकेत केला. त्यानंतर जमा झालेली १ लाख ७ हजार १४४ रुपयेची रक्कम त्यांनी मोजून गॅस एजन्सी कार्यालयातील ड्रॉवर मध्ये ठेवली. व एजन्सी सायंकाळी नेहमीप्रमाणे ७ - ३० वाजण्याच्या सुमारास बंद केली.
 ७ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काळे नेहमीप्रमाणे एजन्सी उघडण्यास गेले. त्यावेळी त्यांना कार्यालयाचे लोखंडी शटर अर्धवट ऊघडे असलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यांना कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व पैसे ठेवलेले ड्रॉवर उघडे तसेच त्यात ठेवलेली रक्कम दिसली नाही. म्हणून त्यांनी सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता त्यांना चार इसमांनी सदर रक्कम चोरी करून नेले असल्याचे आढळून आले. म्हणून त्यांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधांत फिर्याद दिली आहे. 

Web Title: One lakh theft from gas agency shop at Loni kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.