शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी एक लाखांच्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी; पसंतीक्रम भरण्याचा अंतिम दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 10:42 IST

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम ठरवण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

पुणे: पुणे व पिंपरी चिचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांच्या संखेने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे.तसेच प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याचा सोमवारी (दि.७)शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पसंतीक्रम नोंदवावेत,असे आवाहन इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे करण्यात आले आहे. 

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या १ लाख ६ हजार ७७५ जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत या जागांच्या प्रवेशासाठी १ लाख १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.त्यातील ८३ हजार २६७ विद्यार्थ्यांनी अर्जभरून लॉक केला असून ८२ हजार ६४८ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून झाले आहेत.तर एकूण ७४ हजार २१४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी ३० हजार ६०२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून प्रवेशासाठी ७६ हजार १७३ जागा उपलब्ध आहेत.---------------------- अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्य फेरीसाठी आत्तापर्यंत ७७ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ७६ हजार १९७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरून पूर्ण केला आहे.तर ७४ हजार २१६ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केला आहे. मात्र,विद्यार्थ्यांना दुस-या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी सोमवारपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयonlineऑनलाइन