५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:17 PM2021-06-16T22:17:43+5:302021-06-16T22:18:23+5:30

फर्निचरसाठी पैसे घेऊन १ लाख ३२ हजारांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

A one lakh 32 thousands lost to get a concession of Rs 5,000 | ५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

Next

पुणे : ६० हजार रुपयांचे फर्निचर ५५ हजार रुपयांना विकण्याचा बहाणा करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला.

याप्रकरणी सॅलसबरी पार्क येथील एका ६५ वर्षाच्या नागरिकाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवेंद्रकुमार व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या साईटबरोबच आता फेसबुकवर देखील जुन्या वस्तूंच्या विक्रीची जाहिरात देऊन नागरिकांना फसविण्याच्या घटना समोर येत आहेत. 

फिर्यादी हे व्यवसायिक आहेत. त्यांना त्यांच्या  फेसबुकवर फर्निचर विक्रीची जाहिरात दिसली. फर्निचर खरेदी करायचे असल्यामुळे त्यांनी समोरील व्यक्तीशी त्याने दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी त्याने जाहिरातीमध्ये दाखविलेले ६० हजार रूपयांचे फर्निचर ५५ हजार रूपयांना देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले.  त्यांना पैसे ऑनलाईन पाठविण्यासाठी एक खाते क्रमांक दिला. त्या खात्यावर त्यांना पैसे पाठविण्यास सांगितले. फर्निचर पाठविण्यासाठी त्यांच्याकडे आणखी पैशाची मागणी केली. त्यानुसार त्यांनी आणखी पैसे पाठविले.

वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून १ लाख ३२ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे फर्निचर पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर करत आहेत.

Web Title: A one lakh 32 thousands lost to get a concession of Rs 5,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.