Pune: भोर-महाड रस्त्यावरील देवघरजवळ दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 09:06 AM2024-01-10T09:06:59+5:302024-01-10T09:07:09+5:30

भोर ( पुणे ) : भोर - महाड रस्त्यावरील देवघर येथे दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर ...

One killed in two-wheeler collision near Deoghar on Bhor-Mahad road | Pune: भोर-महाड रस्त्यावरील देवघरजवळ दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Pune: भोर-महाड रस्त्यावरील देवघरजवळ दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

भोर (पुणे) :भोर-महाड रस्त्यावरील देवघर येथे दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. मृताचे नाव जयवंत सोपान कराडे (वय ३६, रा. कराडवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) आहे. याबाबत याबाबत जिजाबाई शंकर गोरे (वय ४२, रा. वरंध, ता. महाड) यांनी फिर्याद दिली.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर गोरे हे मोटारसायकलवरून (एमएच ०६-सीई ३८४४) महाड बाजूकडे जात होते. महाड बाजूकडून विना नंबरप्लेट मोटारसायकलवरील चालक जयवंत सोपान कराडे यांनी त्याची मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून समोरील गोरे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये जिजाबाई व पती शंकर गोरे यांना दुखापत झाली आहे. या अपघातात जयवंत कराडे यांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन्ही मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे.

Web Title: One killed in two-wheeler collision near Deoghar on Bhor-Mahad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.