शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू; घर्षणाने लक्झरी बस व दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 13:24 IST

सुदैवाने लक्झरी बसमधील जिवितहानी टळली

इंदापूर : लोणी देवकर (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर हायवे रोडवरून (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५) यावली(ता.मोहळ) येथे जात असताना दुचाकीस्वाराला पाठीमागून येणार्‍या अशोक लेलंड दोस्त टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना १२ मे रोजी घडली आहे. याबाबत मयत इसमाचा भाऊ राहुल शंकर मेमाणे (वय ५२) रा.कोरेगाव मुळ, इनामदार वस्ती, ता. हवेली, जि. पुणे यांनी टोम्पो चालक याचे विरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सदर अपघाताग्रस्त दुचाकी ही पाठीमागून येणार्‍या व सोलापूर दिशेने जाणारी लक्झरी बस (क्र. एम. एच. ११, सी.एच. ६६७६) या बसखाली अडकून रस्त्याने फरफटत गेल्याने घर्षन होऊन दुचाकी व लक्झरी बसने पेट घेतला. लक्झरी बस व दुचाकी ही दोन्हीही वाहणे जागेवर जळून खाक झाली. सुदैवाने लक्झरीने पेट घेतल्यानंतर गाडी चालकाने प्रसंगवधान राखत लक्झरी बस रस्त्याच्या कडेला उभी केली व गाडीतील सर्व प्रवाशांना गाडीतून सुखरूप खाली उतरविले. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. परंतु प्रवाशांचे सामान, साहित्य सर्व जळून खाक झाले.

अनिल कविराज राऊत (रा.जळकोट, जि. लातुर) असे टेम्पो चालकाचे नाव असून त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड दोस्त टेम्पो (क्र. एम. एच. १४, जीडी ८५१४) हा भरधाव वेगात, हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणाने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघातास व फिर्यादीचे मावस भावाच्या मृत्युस कारणीभूत व स्वत:चे टेम्पोचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरAccidentअपघातBus Driverबसचालकtwo wheelerटू व्हीलर