भिगवण : बारामती-भिगवण रोडवरील लामजेवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.५) रात्री ८ वाजेच्या सुमारास कंटेनर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अक्षय बबन आव्हाड (वय २३, मूळ रा. खानापूर, जि. अहिल्यानगर, सध्या रा. बारामती) याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. याबाबतची भिगवण पोलिस स्टेशनला योगेश सिध्देश्वर शिंदे (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली. मृत अक्षय आव्हाड हा कामानिमित्त बारामती येथे राहत होता.
भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅकवरील (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ताबा सुटल्याने दुचाकीला (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरदार धडक बसली. यात अक्षय आव्हाड याच्या डोक्यात, हातापायास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. यामुळे अपघातास जबाबदार असणारा ट्रकचालक आरोपी इराणा यशवंत अलगी (वय ४०, रा. मनकलगी, ता. विजापूर राज्य कर्नाटक) याच्याविरुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलिस करत आहेत.