बिबवेवाडीत पोलिसाकडून गोळीबारात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:14 IST2018-03-22T14:14:59+5:302018-03-22T14:14:59+5:30
पोलीस कर्मचारी हा परिसरातील एकाचा अंगरक्षक असून तो मंदिरात दर्शनासठी गेला असताना पाया पडण्यासाठी खाली वाकल्यानंतर अचानक फायरिंग झाली.

बिबवेवाडीत पोलिसाकडून गोळीबारात एक जखमी
पुणे: बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयटी कॉलेज जवळ गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी भरदिवसा घडली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे़ . गणेश प्रकाश कांबळे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा गोळीबार एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कर्मचारी हा परिसरातील एकाचा अंगरक्षक असून तो मंदिरात दर्शनासठी गेला असताना पाया पडण्यासाठी खाली वाकल्यानंतर अचानक फायरिंग झाली. त्यात गणेश कांबळे हे जखमी झाले आहेत. गणेश कांबळेच्या पोटात गोळी लागली असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पोहचले असून अधिक तपास सुरु आहे़.