शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कांद्याचा ट्रक उलटला, चालक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 09:56 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगाने जाणारा कांद्याचा ट्रक वलवण गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उलटला आहे.

लोणावळा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगाने जाणारा कांद्याचा ट्रक वलवण गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उलटला आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. कांद्याचा ट्रक उलटल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी कांदा पळवण्यासाठी मोठी झुंबड होती. आज सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला कांद्याचा ट्रक हा चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मार्गाच्या सुरक्षा कठड्याला सुमारे शंभर मीटर घासत जाऊन पुढे पुलावरून खाली कोसळला. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकमधून मोठ्या प्रमाणात कांदा सर्वत्र पसरला होता हा कांदा पळविण्याकरिता नागरिकांनी मोठी झुंबड करत पोतीच्या पोती भरून कांदे लंपास केले. महामार्ग पोलीस व आयआरबी कर्मचारी यांनी रस्त्यावर पडलेला कांदा बाजूला करत पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू केली. दरम्यानच्या काळात वाहतूक ही वलवण गावातून वळविण्यात आली होती. सदरच्या अपघातात ट्रकचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. जखमी चालकावर निगडी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्य़ाची माहिती  पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Accidentअपघातlonavalaलोणावळाonionकांदा