शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

पुणे ते दौंड या एक तासाच्या प्रवासाला जेव्हा लागतो सात तासांचा वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 11:25 IST

रेल्वेचा ब्लॉक ठरला प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा

ठळक मुद्दे मध्य रेल्वे च्या पुणे विभागाकडून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त

पुणे : पाटस ते दौंडदरम्यान सबवेच्या कामासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेला ब्लॉक शनिवारी प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. या कामामुळे पुण्यातून सायंकाळी ६.१० वाजता निघालेल्या सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसला दौंडला पोहोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. पहाटे चार वाजता ही गाडी सोलापूर स्थानकात पोहोचली. त्यापाठोपाठ इतर लांबपल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्याने हजारो प्रवाशांचे खूप हाल झाले. रेल्वे प्रशासनाने दौंड ते पाटसदरम्यान सबवे बनविण्यासाठी (कॉर्डलाईन) दि. ७ मार्च रोजी ६ तासांचा मेगा ब्लॉक घेतला होता. त्यासाठी काही गाड्या रद्दही करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वेला होती. पण हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुढील गाड्यांना विलंब होत गेला. पुण्यातून पुणे-सोलापूर इंटरसिटी गाडी सायंकाळी ६.१० वाजता निघाली. या गाडीच्या पुढे झेलम एक्स्प्रेस होती. इंटरसिटी एक्स्प्रेसला दौंड स्थानकात पोहोचण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. पण ही गाडी कासवगतीने पुढे जात-जात रात्री ८.४० च्या सुमारास केडगाव स्थानकात पोहोचली. सबवेचे काम पूर्ण होत नसल्याने ११ वाजेपर्यंत ही गाडी केडगाव स्थानकातच उभी होती. गाडीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही होती. त्यामुळे केडगाव स्थानकात उतरून अनेकांनी मिळेल ते खायला घेतले. पण अनेकांची मोठी गैरसोय झाली. कोणत्याही स्थानकावर प्रवाशांना गाडी कधी निघणार, याची माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवासीही या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते. अखेर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही गाडी दौंड स्थानकात दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.इंटरसिटी एक्स्प्रेसपाठोपाठ गरीबरथ, चेन्नई एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे दौंड शटल, कोणार्क एक्स्प्रेस, कन्याकुमारी एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस, पुणे-दानापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्याही अडकून पडल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला, अशी माहिती दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी दिली.---------------------------प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. त्यानुसार सबवेचे काम सुरू होते. पण हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अर्धवट काम सोडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शनिवारीच काम पूर्ण करण्यात आले. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, याची जाणीव आहे. त्याबाबद्दल दिलगीर आहोत.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेSolapurसोलापूरpassengerप्रवासी