शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, सिंहगड रोड परिसरातील घटना; नागरिकांत संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 17:17 IST

सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे हा अपघात घडला असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे....

धायरी (पुणे) : अवजड डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे हा अपघात घडला असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे. संजय राजाराम बाबर (वय: ५० वर्षे, रा. जावळी जिल्हा सातारा) असे त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक मल्लिकार्जुन नीळकंठराव बिराजदार (वय : ३९ वर्षे, रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता, मूळगाव : गुलबर्गा) याला ताब्यात घेतले असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी 'लोकमत'ला दिली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय बाबर हे नांदोशी येथील मनन आश्रमजवळ असणाऱ्या एका विहिरीचे काम करण्यासाठी आले होते. दरम्यान ते नांदोशी येथील मुख्य रस्त्यावरून चालत जात असताना बाजूने चाललेल्या डंपरने अचानकपणे डाव्या बाजूला आपले वाहन घेतले. मात्र डाव्या बाजूला चालत जाणारे संजय बाबर हे चालकाला दिसले नसल्याने त्यांना डंपरची जोराची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे डंपरचालक व इतर डंपरचालकांनी त्यांना खाली उतरुन पाहिले. तसेच त्यांना वाहनाखालून ओढून काढून बाजूला टाकले व सर्व डंपर तेथून मार्गस्थ झाले. 

अवजड वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन...

स्थानिक महसूल खात्याच्या आशीर्वादाने नांदोशी परिसरात क्रशर, दगडाच्या खाणी, चालविल्या जात असताना पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. खाण व क्रशरधारक राजरोजपणे बेकायदेशररित्या नियमांना बगल देत अक्षरशः डोंगरांची चाळण करत आहेत यातून नियमापेक्षा जास्त उत्खनन करून शासनाच्या रॉयल्टीला चुना लावत आहेत. सर्व क्रशरधारक खाण धारक उत्खनन या व्यवसायातून लाखो रुपयाचा मलिदा खाण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांना सकाळी साडेआठ ते अकरा व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत परिसरात वाहतुकीस बंदी असताना देखील नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस