शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:09 IST

इंदापूर पोलिसांनी धडक देणाऱ्या मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग करून काळेवाडी चालकाला येथे अटक केली.

ठळक मुद्देमद्यधुंद चालक : बेदरकारपणे मोटार चालवित सहाजणांना केले जखमी

बिजवडी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी गावाच्या हद्दीत मद्यधुंद कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवित तीन दुचाकीस्वरांना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकजण मृत्यूमुखी पडला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) दुपारी दीड ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात हिरालाल अर्जुन पवार (वय ३५ रा. हिरजगाव, ता. उत्तर सोलापूर) हे मृत्यूमुखी पडले आहेत. पवार यांचा सहा वर्षांचा मुलगा तुकाराम, शंकर दगडू चव्हाण (वय ३०, रा. वोळे कासेगाव, सोलापूर), विजयकुमार सोपान चव्हाण (वय ३२, रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर), विष्णू लक्ष्मण राऊत (वय ४५, रा. कौठळी, ता. इंदापूर), तुळशीराम विठ्ठल मस्तुद (वय ३२, रा. अकलूज, जि. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. मोटारचालक सतीश भानुदास सुर्यवंशी (वय ३२, रा. कळाशी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सूर्यवंशी मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवीत इंदापूरहून पुण्याकडे जात होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शहरालगत पुणे बाजूकडून येणा-या दुचाकीवरील हिरालाल, मुलगा तुकाराम, मेहुणा शंतनु दगडू चव्हाण हे सोलापूरकडे जात होते. त्यांना आरोपी चालवित असलेल्या मोटारीची आधी धडक बसली. त्याने अपघात घडल्यानंतरही मोटार तशीच पुढे दामटविली. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर साधारण २० किलोमीटरवरील पळसदेव गावच्या हद्दीत दोन दुचाकींना पाठीमागून धडक देऊन विजयकुमार सोपान चव्हाण, विष्णु लक्ष्मण राऊत व तुळशीराम विठ्ठल मास्तुद या तिघांना जखमी केले.तिथेही मोटार न थांबवता तो पुढे पळाला. दरम्यान, इंदापूर पोलिसांनी मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग करून चालकाला काळेवाडी पुलाजवळ थांबवले. त्याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरCrimeगुन्हाAccidentअपघातPoliceपोलिस