परवाना नूतनीकरणातून आरोग्य विभागाला एक कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:58+5:302021-01-14T04:09:58+5:30
पुणे : पालिकेच्या आरोग्य विभागाला कोरोना काळातही एक कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विविध प्रकारच्या परवाना नूतनीकरणामधून हा महसूल मिळाला ...

परवाना नूतनीकरणातून आरोग्य विभागाला एक कोटींचे उत्पन्न
पुणे : पालिकेच्या आरोग्य विभागाला कोरोना काळातही एक कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विविध प्रकारच्या परवाना नूतनीकरणामधून हा महसूल मिळाला असून, मागील तीन महिन्यांत ३० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील लाॅज, मंगल कार्यालये, सलून, ब्युटीपार्लर, अंडेविक्री, भुर्जी विक्री, धान्यभट्टी, आइस फॅक्टरी, कातडीसाठा, पानपट्टी, ऊस रसाचे गुऱ्हाळ, पाळीव जनावरांची विक्री, घाेडा व्यावसायिक आदी व्यवसाय करणाऱ्यांना आवश्यक असलेला परवाना दिला जातो. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. या काळात परवाना नूतनीकरणाचे काम थांबले होते. आरोग्य कर्मचारीही कोरोना ड्युटीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे परवाना देणे, नूतनीकरण आणि शुल्क भरणा बंदच होता.
ऑगस्ट महिन्यात लॉकडाऊनमधून काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर शासकीय कार्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर, आता या परवान्यांचे काम सुरू करण्यात आले. परवाने नूतनीकरणास डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. व्यावसायिकांकडून केवळ परवाना नूतनीकरण शुल्क घेतले जात आहे.
आरोग्य विभागाला वर्षभरात १ काेटी २ लाख ४ हजार ३९० उत्पन्न मिळाले असून, त्यापैकी ऑक्टाेबरमध्ये ९ लाख १९ हजार १५८ रुपये, नाेव्हेंबरमध्ये ११ लाख ६२ हजार ७१८, तर डिसेंबरमध्ये ११ लाख ८७ हजार ६०६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.