बारामतीतील पती-पत्नीच्या खुन प्रकरणी एकास अटक; खुनाचे कारण उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:16 IST2024-04-15T13:16:13+5:302024-04-15T13:16:49+5:30
घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे....

बारामतीतील पती-पत्नीच्या खुन प्रकरणी एकास अटक; खुनाचे कारण उघड
बारामती :बारामती शहरातील कसबा जामदार रोड परीसरात शनिवारी (दि. १३) इमारतीमधील सदनिकेत पती पत्नीचा भर दिवसा खून झाल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे.
खत्री पवार एन्क्लेव्ह या इमारतीमध्ये सचिन महालिंग वाघोलीकर (वय ५०) आणि सारिका सचिन वाघोलीकर (वय ४२) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी यश सचिन वाघोलीकर या वाघोलीकर दांपत्याच्या मुलाने फिर्याद दिली. दिग्विजय गणेश झणझणे असे संशयित आरोपीचे नाव आहे. झणझणे याने आर्थिक कारणावरून वाघोलीकर दाम्पत्याचा गळा कापून खून केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.