तळेगाव दाभाडे येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:41 IST2021-07-13T19:41:15+5:302021-07-13T19:41:49+5:30
तळेगाव दाभाडे येथील चौराईनगर येथे असलेल्या खिंडीत एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तळेगाव दाभाडे येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
कार्तिक संभाजी कारके (वय २१, रा. शंकरवाडी ऊर्से, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सतीश मिसाळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील चौराईनगर येथे असलेल्या खिंडीत एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कार्तिक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली.