मंचर मध्ये पधरा दिवसात साडेचरशे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST2021-04-18T04:10:56+5:302021-04-18T04:10:56+5:30
मंचर ग्रामपंचायत कार्यालयात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीला शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब ...

मंचर मध्ये पधरा दिवसात साडेचरशे रुग्ण
मंचर ग्रामपंचायत कार्यालयात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीला शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील,पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले,उपसरपंच युवराज बाणखेले,तहसिलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे,पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे,ग्रामपंचायत सदस्य सतिश बाणखेले,माणिक गावडे,ज्योती निघोट,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे,लक्ष्मण थोरात भक्ते,पंडीत माशेरे,मंडलअधिकारी दिपक मडके,हेमंत भागवत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.मंचर शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कोरोनाची चैन तोडण्यासाठी मंचर ग्रामपंचायत हद्दीतील अत्यावश्यक मेडिकल,हॉस्पिटल सेवा वगळता इतर सर्व दुकानदारांनी दुकाने शुक्रवार दि.३० पर्यंत बंद ठेवावी.असा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.दुध,किराणा,भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तु घरपोच पुरविण्यासाठी मंचर ग्रामपंचायतीत अत्यावश्यक मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.