शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

SSc Result 2020: अरे, आव्वाज कुणाचा! दहावीच्या निकालामध्ये पुण्यात मुलींचाच डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 18:01 IST

पुणे जिल्ह्यात एकुण १ लाख २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण

ठळक मुद्देपुणे शहरामध्ये एकुण ४६ हजार ६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा; त्यापैकी ४१ हजार ३५ जण उत्तीर्ण

पुणे : जिल्ह्यातील मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावीच्या निकाला मुलांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे पुणे शहरासह वेल्हा व मुळशी तालुक्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. तसेच वेल्हा तालुक्यातील परीक्षा दिलेल्या सर्व ३३७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.६२ तर मुलांची ९७.२७ एवढी आहे.

पुणे जिल्ह्यात एकुण १ लाख २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २४ हजार ७६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये मुलींची संख्या ५९ हजार ६९७ एवढी आहे. एकुण १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला आहे. आंबेगाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९८.५४ टक्के लागला असून २९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी ९६.७४ टक्के निकाल इंदापुर तालुक्याचा आहे. 

--------------

वेल्ह्यातील सर्व मुली उत्तीर्ण

दुर्गम तालुका असलेल्या वेल्ह्यामध्ये एकुण ६६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३३७ मुली आहेत. या सर्व मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ३२५ मुलांपैकी ३१२ मुले उत्तीर्ण झाली आहे. परीक्षेसाठी मुलींचीच नोंदणी अधिक होती. वेल्ह्याप्रमाणेच मुळशी तालुक्यातही मुलींची नोंदणी अधिक होती. परीक्षा दिलेल्या एकुण २९०३ विद्यार्थ्यांपैकी १४५८ मुली होत्या. त्यापैकी १४३३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

---------------

पुणे शहरातही मुलींची बाजी

पुणे शहरामध्ये एकुण ४६ हजार ६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४१ हजार ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये २० हजार ८१७ मुली व २० हजार २१८ मुले आहेत. उत्तीर्णतेमध्ये मुलींची संख्या मुलींपेक्षा अधिक ठरली आहे. विशेष म्हणजे परीक्षा दिलेल्या एकुण विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या जवळपास चार हजाराने अधिक होती. तरीही यश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी मुलांना मागे टाकले आहे.

-----------------------

जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल

तालुका       परीक्षेला बसलेले  उत्तीर्ण                      टक्केवारी

आंबेगाव              २९४५       २९०२                 ९८.५४

बारामती।              ५९५५     ५८५९            ९८.३९

भोर                    २२१४       २१६५।           ९७.७९

दौंड                   ५३८२        ५२१८            ९६.९५

हवेली                 १२६०६     १२३६१           ९८.०६

इंदापुर                ६२०१        ५९९९            ९६.७४

जुन्नर।                 ५४००        ५२८०            ९७.७८

खेड                   ६५५३         ६३४५               ९६.८३

मावळ।              ४७९६         ४७०८              ९८.१७

मुळशी              २९०३         २८२५              ९७.३१

पुरंदर                २९३९       २८९४            ९८.४७

शिरूर              ६०३७         ५९०५            ९७.८१

वेल्हा                 ६६२         ६४९               ९८.०४

पुणे शहर-पश्चिम १८८४९    १८५०३          ९८.१६

पुणे शहर-पुर्व २३०१४।       २२५३२           ९७.९१

पिंपरी चिंचवड १८३०६         १८०३०           ९८.४९

------------------------------------------------

एकुण १२४७६२।          १२२१७५          ९७.९३

------------------------------------------------

जिल्ह्यातील मुले व मुलींची टक्केवारी

       परीक्षेला बसलेले   उत्तीर्ण     टक्केवारी

मुली      ५९६९७     ५८८७५    ९८.६२

मुले        ६५०६५    ६३३००   ९७.२९

---------------------------------------

मुलींच्या उत्तीर्णतेत पहिले तीन तालुके

वेल्हा - १०० टक्के

आंबेगाव - ९९.३५

बारामीत - ९९.१५

---------------------

उत्तीर्णतेत मुलींची संख्या अधिक

                    मुले               मुली

पुणे शहर      २०,२१८         २०,८१७

वेल्हा            ३१२            ३३७

मुळशी         १३९२          १४३३

--------------------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण