पुणे-नाशिक महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटले एकाचा जागीच मृत्यू ,दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:01 AM2024-04-08T11:01:45+5:302024-04-08T11:02:32+5:30

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे एकाचा मृत्यू व दोन जण गंभीर जखमी....

On the Pune-Nashik highway, the car lost control, one died on the spot, two were injured | पुणे-नाशिक महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटले एकाचा जागीच मृत्यू ,दोघे जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटले एकाचा जागीच मृत्यू ,दोघे जखमी

राजगुरुनगर (पुणे) :पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे एकाचा मृत्यू व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ७ रोजी पहाटे घडली आहे. भरत मच्छिंद्र नऱ्हे (रा. पाबळ, ता.शिरूर) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-नाशिक महामार्गावर वेहळदरा गावचे हद्दीत नाशिक बाजुकडे एम.एफ १२ क्यू.टी. ३७१७ हे वाहन भरधाव वेगात जात असताना एका गाडीला ओव्हरटेक करीत असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील संदीप कोहिनकर, नवनाथ जगताप हे गंभीर जखमी झाले. भरत मच्छिंद्र नऱ्हे ह्याला डोक्यास हातापायास गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. याबाबत चालक संदीप नारायण थिगळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहे.

Web Title: On the Pune-Nashik highway, the car lost control, one died on the spot, two were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.